-
श्रद्धा वालकर या तरुणीच्या खूनाने संपूर्ण देश हादरला आहे. मृत श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावाला याने सहा महिन्यापूर्वी श्रद्धाचा निर्घृण खून केला होता.
-
आफताबने श्रद्धाच्या शरीराचे सुमारे ३५ तुकडे करून जंगलाच्या विविध भागात फेकले होते.
-
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून श्रद्धाच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याचं काम केलं जात आहे.
-
दरम्यान, सोमवारी पोलिसांनी आणखी शरीराचे तुकडे गोळा केले आहेत. यामध्ये कवटीच्या आणि जबड्याचा भाग असल्याची माहिती आहे.
-
तसेच आणखी तीन अवयवही सापडले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
-
सर्व अवयव एकाच ठिकाणी सापडले असून सर्व अवयव फॉरेंन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
-
यापूर्वी दिल्ली पोलिसांनी श्रद्धाच्या शरीराचे १७ तुकडे गोळा केले होते. हे सर्व तुकडे फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले होते.
-
तसेच आफताबने श्रद्धाचे शिर मैदान गढी येथील तलावात टाकल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी रविवारी मैदान गढी येथील तलावात शोध घेतला होता.
-
याबरोबरच मेहरौलीच्या जंगलातून काही अवयव गोळा केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आफताबच्या छतरपूर येथील घरातूनही काही पुरावे जप्त केले होते.

पुढल्या महिन्यापासून पैसाच पैसा! शनिदेवाच्या राशीत राहूचे गोचर होताच ‘या’ ५ राशी होणार गडगंज श्रीमंत? तुम्ही आहात का भाग्यवान?