-
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे युवानेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली.
-
या भेटीवेळी आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तेजस्वी यांना भेट दिली.
-
तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ये दोस्ती आगे चलती रहेगी.
-
संविधान बचाव आणि लोकशाही वाचवण्यासाठी दोन युवा नेत्यांची ही भेट होती असं आदित्य ठाकरे म्हणाले.
-
पर्यावरण, विकासात्मक गोष्टींवर चर्चा, औद्योगिक विकास, देशातील युवकांच्या रोजगाराच्या समस्यांबाबतही चर्चा केली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
-
या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना संविधान आणि लोकशाहीसाठी देशातल्या तरूणांनी संपर्कात राहून, एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.
-
आदित्य ठाकरे यांनी पटना येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची सदिच्छा भेट घेतली.
-
यावेळी सध्याच्या विविध विषयांवर चर्चा झाली.
-
बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी नितीश कुमार यांचे जुने संबंध आहेत, त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
-
या भेटीपूर्वीही नितीश कुमार, तेजस्वी यादव यांच्याशी आमचं बोलणं व्हायचं. सध्या नितीश कुमार, तेजस्वी यादव बिहारमध्ये उत्तम काम करत आहेत. असंही आदित्य म्हणाले.
-
आमच्यात कोणतीही कटुता नाही. ही मित्रता आगामी काळातही अशीच राहील, असा मला विश्वास आहे.
-
या भेटीला राजकीय रंग देऊ नये, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”