-
कर्नाटक सरकारने सांगलीतील जत तालुक्यामधील ४० गावांवर दावा सांगण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनीही संताप व्यक्त केला असून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
-
महाराष्ट्रात अत्यंत दुबळं, हतबल सरकार असल्यानेच महाराष्ट्र-कर्नाटक वाद निर्माण होत आहे.
-
महाराष्ट्रात जे सरकार आलं आहे त्यामुळे अनेक राजकीय दरोडेखोरांना आपण महाराष्ट्राचे लचके तोडू शकतो, असं वाटत आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
-
त्यांना महाराष्ट्र माहित नाही, महाराष्ट्र समजलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी सीमाभागातील कोणत्या प्रश्नांना वाचा फोडली आहे? गेली अनेक वर्षं ते या खात्याचे मंत्री आहेत.
-
कर्नाटकचे मुख्यमंत्री, पंतप्रधानांशी चर्चा करु असं त्यांनी परवा जाहीर केलं होतं, आणि लगेच कर्नाटकच्या मुख्यमंत्री सांगतीलील जत तालुक्यावर दावा सांगितला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
-
कर्नाटकात भाजपाचं सरकार आहे. महाराष्ट्रातही भाजपाच्या नेतृत्वाखाली एक मिंधे सरकार आहे. कोणाला मुंबई तोडायची आहे, तर कोणाला महाराष्ट्रातील गावं आणि जिल्हे तोडायची आहेत.
-
अशारितीने महाराष्ट्र कुरतडण्याचं काम गेल्या साडे तीन महिन्यांपासून जोरात सुरु आहे. हे आमचे मुख्यमंत्री त्यांच्या ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत.
-
तेथून परतल्यानंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यावर दावा सांगितला नाही म्हणजे मिळवलं, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
-
राज्यातल मिंधे सरकार लवकरात लवकर घालवलं पाहिजे, नाहीतर केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO