-
दिल्लीतील प्रसिद्ध जामा मशिदीमध्ये मुलींनी एकट्य़ाने किंवा गटाने प्रवेश करू नये, असा सूचना फलक प्रवेशद्वाजवळ लावण्यात आला होता.
-
मशीद प्रशासनाच्या या निर्णयानंतर देशभरात वाद निर्माण झाला होता. याची दखल महिला आयोगानेही घेतली होती.
-
दरम्यान, दिल्लीचे नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांना विनंती केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.
-
नायब राज्यपालांनी यासंदर्भात माझ्याशी चर्चा केली असून त्यांच्या विनंतीनंतर आम्ही हा निर्णय मागे घेतला असल्याचे बुखारी यांनी सांगितले.
-
या निर्णयावरून वाद निर्माण झाल्याने शाही इमाम यांनी हा आदेश नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्या मुलींसाठी नाही, असेही स्पष्ट केले होते.
-
या प्रकरणाची महिला आयोगाकडूनही दखल घेण्यात आली होती. हा निर्णय म्हणजे महिलांच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिली होती.
-
जामा मशिदीमध्ये महिलांना प्रवेशास बंदी हे अत्यंत चुकीचे आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांनाही प्रार्थनेचा अधिकार आहे, मी जामा मशिदीच्या इमामांना नोटीस पाठवत आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या.
-
दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालवीय यांनी ट्वीट करत हा निर्णय लाजीरवाणा आणि असंवैधानिक आहे, असेही म्हटले होते.
-
शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांच्या म्हणण्यानुसार, मशीद परिसरातील काही घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
-
जामा मशिद हे प्रार्थनास्थळ असून यासाठी नागरिकांचे स्वागत आहे. परंतु मुली एकट्य़ा येतात आणि त्यांच्या मित्रांची प्रतीक्षा करतात. ही जागा यासाठी नाही म्हणून बंदी घातली, असेही ते म्हणाले होते.
-
मशीद, मंदिर किंवा गुरुद्वारा ही ठिकाणे प्रार्थनास्थळे आहेत. यासाठी कोणतेही प्रतिबंध नाहीत. आज २०-२५ मुली आल्या होत्या. त्यांना प्रवेश देण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.
-
या अगोदरही मशिदीमध्ये आलेल्या काही जणांनी चित्रिकरणाचा प्रयत्न केला होता. त्याला प्रतिबंध करण्यात आला होता. अनुचित प्रकार करणाऱ्या लोकांना प्रतिबंध करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”