-
मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये वैविध्यपूर्ण असे नवे बदल करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्यानात लाकडी ओंडक्यापासून पशुपक्षी बनवण्याचे काम हाती घेतले आहे.
-
रिवली येथील शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात लाकडी घुबड, कोंबडा, ससा, अस्वल, मांजर आणि वेगवेगळे कार्टून्स तयार केले आहेत.
-
लहान मुलांनी मोबाइलमधून बाहेर पडून निसर्गात रमण्यासाठी हा उपक्रम सुरू आहे.
-
वाचनालयासह लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ पशुपक्षी तयार करण्यात आले आहेत.
-
आर मध्य विभागाने उद्यानात ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ हे उद्दिष्ट समोर ठेऊन पावसाळ्यात उन्मळून पडलेल्या मुंबईतील वृक्षांच्या ओंडक्यांपासून लहान मुलांचे आकर्षण असणारे कार्टून्स बनविले आहेत.
-
अबालवृद्धांना मोबाइलच्या विश्वातून बाहेर काढण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षण जागृतीसाठी उद्यान विभाग प्रयत्नशील आहे.
-
त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
-
लोकसहभागातून वृक्ष संजीवनी अभियान, बालदिनी मुलांच्या हस्ते वृक्षारोपण,
-
अबालवृध्दांसाठी नर्सरी प्रशिक्षण, उद्यानात मोफत वाचनालय असे अनेक उपक्रम उद्यान विभागामार्फत राबवले जात आहेत.
-
या अनोख्या प्रयोगामुळे उद्यानाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
-
लाकडी ओंडक्यापासून बनवलेले प्राणी आकर्षक दिसत आहेत.
-
लाकडी ओंडक्यांपासून सुंदर पशूपक्षांसह विविध कार्टुन्सही तयार करण्यात आले आहेत.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ