-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात शनिवारी (२६ नोव्हेंबर) शिंदे-फडणवीस सरकार आणि बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला.
-
या भाषणा उद्धव ठाकरेंनी अनेकांची नावं घेत टीका केली, तर काहींना नाव न घेता अप्रत्यक्ष टोले लगावले.
-
एकूणच त्यांच्या भाषणातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा हा आढावा.
-
दसऱ्याचा मेळावा परंपरेनुसार शिवतीर्थावर झाला. तेव्हाच मी ठरवलं होतं की शिवतीर्थापासून सुरुवात केल्यावर मुंबईच्या बाहेर माझी जी पहिली सभा होईल ती जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या माझ्या बुलढाण्यात घेईल – उद्धव ठाकरे
-
ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचे आशीर्वाद घेऊनच पुढे निघालं पाहिजे. म्हणून मी आज तुमच्या समोर आलो आहे – उद्धव ठाकरे
-
आज संविधान दिन आहे. या दिवशी हे संविधान सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते – उद्धव ठाकरे
-
संविधान सुरक्षित आहे का हाच प्रश्न माझ्याही मनात आहे आणि तुमच्याही मनात असायला हवा. कारण पुढील वाटचाल आपल्याला त्याच दिशेने करावी लागणार आहे – उद्धव ठाकरे
-
आपली पुढील लढाई लोकशाही वाचवण्याची असणार आहे. आज आपल्याला लोकशाही हवी की हुकुमशाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे – उद्धव ठाकरे
-
काही जण ४० रेडे घेऊन गुवाहटीला गेले आहेत. हे रेडे मी म्हटलेलं नाही. त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने आमचे ४० रेडे तिकडे गेल्याचं म्हटलं होतं – उद्धव ठाकरे
-
मी मुख्यमंत्री झाल्यावर शिवतीर्थावरच शपथ घेतली आणि पहिल्यांदा आमची कुलस्वामिनी एकविरा आईच्या दर्शनला गेलो. त्यानंतर मी अयोध्येला गेलो होतो. हे आज तिकडे गुवाहटीला नवस फेडायला गेले आहेत – उद्धव ठाकरे
-
गेल्या आठवड्यात स्वतःचा हात दाखवायला गेले होते. म्हणजे ज्याला स्वतःचं भविष्य माहिती नाही तो आपलं भविष्य ठरवणार आहे – उद्धव ठाकरे
-
त्यांचं भविष्य कुडमुड्या ज्योतिषाला विचारून उपयोग नाही. कारण त्यांचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसले आहेत – उद्धव ठाकरे
-
दिल्लीत बसलेलेच त्यांचे मायबाप आहेत. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं आणि हे सांगतात हिंदुत्व वाचवायला शिवसेना सोडून गेले – उद्धव ठाकरे
-
ते जुने चेहरे फसवे होते, गद्दार निघाले. त्यांना वाटलं हा बुलढाणा म्हणजे त्यांची मालमत्ता आहे – उद्धव ठाकरे
-
हे इकडे जमलेले मर्द मावळे हेच धगधगत्या मशाली आहेत. या पेटत्या मशाली अन्याय जाळायला निघाल्या आहेत – उद्धव ठाकरे
-
आपलं सरकार चांगलं चाललं होतं, पण आपलं सरकार पाडलं गेलं. नितीन देशमुखांनाही दे गुवाहाटीला घेऊन गेले होते, पण त्यांनी सांगितलं की, तुम्ही मला कापलं तरी तुमच्याबरोबर येणार नाही. मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणूनच राहणार आहे. नितीन देशमुख परत आले – उद्धव ठाकरे
-
त्यांना आशीर्वाद घ्यायला गुवाहटीला जाण्याची गरज लागली, मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. मी जिजाऊंच्या जन्मस्थान असलेल्या बुलढाण्यात माझ्या माता-भगिणींचे आणि शेतकरी बांधवांचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे – उद्धव ठाकरे
-
मी पुन्हा नव्या दमाने आणि त्वेषाने उभा आहे. जिंकणार म्हणजे जिंकणारच. हा माझा आत्मविश्वास तुम्ही आहात – उद्धव ठाकरे
-
आपल्या पलिकडच्या ताईंना धमक्या देण्यात आल्या. खास मुंबईहून इकडे ताईंकडे दलाल पाठवले जायचे. त्यांच्या चेलेचपाट्यांना अटक झाली, पण ताई मोठ्या हुशार निघाल्या – उद्धव ठाकरे
-
ताईंनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली. ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’. तो राखी बांधल्याचा फोटो छापून आणला आणि मग तो फोटो छापून आल्यावर ताईंवर कारवाई करण्याची ईडी-सीबीआयवाल्यांची हिंमत आहे का? – उद्धव ठाकरे
-
त्या तिकडे गेल्यावर त्यांना सर्व आरोपांपासून संरक्षण मिळालं. ही तुमची सर्व चालुगिरी लोक बघत आहेत – उद्धव ठाकरे
-
आजचा भाजपा पक्ष आयात पक्ष झालाय. विचार संपले, नेते संपले, भाकड पक्ष झाला आहे – उद्धव ठाकरे
-
तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फक्त यादी काढा आणि त्यात बाहेरून यांच्या पक्षात आयात केलेले किती लोक आहेत हे पाहा. त्यामुळे हा आयात पक्ष झाला आहे – उद्धव ठाकरे
-
या आयात पक्षाची सुरू असलेली दादागिरी, हुकुमशाही आपल्या मर्द मावळ्यांना मोडता येणार नाही का? – उद्धव ठाकरे
-
अरे हा पक्ष आहे की चोरबाजार? त्यांच्याकडे स्वतःकडे काहीच शिल्लक राहिलं नाही. ते बाहेरून चोरून इतरांचे नेते घेत आहेत आणि आपल्याविरोधात त्यांना उभे करत आहेत – उद्धव ठाकरे
-
तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ४० रेड्यांनी, गद्दारांनी त्यांच्यात मर्दानगी शिल्लक असेल, तर जाहीर सांगावं की, ते भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही – उद्धव ठाकरे
-
त्यांना नाव बाळासाहेब ठाकरेंचं हवं, चेहरा बाळासाहेबांचा हवा, शिवसेनेचं नाव पाहिजे आणि मोदींचा आशीर्वाद पाहिजे. मग त्यांची मेहनत कोठे आहे? – उद्धव ठाकरे
-
गुजरात निवडणुकीसाठी उद्योग तिकडे पाठवताहेत. काल कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातला गावांवर हक्क सांगताहेत. पुढल्या वर्षी कर्नाटकची निवडणूक उद्या भाजप महाराष्ट्राचे तुकडे करतील – उद्धव ठाकरे
-
कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे तुकडे केले तरी मिंधे गप्प बसतील. ते सांगतील की, मोदींनी सांगितलंय ४० गावं देऊन टाका, पाकव्याप्त काश्मीर भारतात आल्यावर तुम्हाला ४० च्या बदल्यात १०० गावं देऊ – उद्धव ठाकरे
-
आता विठोबाला पण कर्नाटकात नेणार, अक्कलकोटचे स्वामी समर्थही तिकडे नेणार का?- उद्धव ठाकरे
-
मी मुख्यमंत्री असताना राज्यपालांचा आगाऊपणा सहन केला नाही – उद्धव ठाकरे
-
काल अमित शहा बोलले आम्ही धडा शिकवला. पण बाबरी पाडल्यावर शिवसेना उभी राहिली, अमरनाथ यात्रेवेळी शिवसेनाप्रमुख उभे राहिले – उद्धव ठाकरे
-
अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो, तर लाथ घालून हाकललं असतं, जसं मी तेव्हा एकाला हाकललं – उद्धव ठाकरे
-
महाराष्ट्राचा अपमान होतोय, देवतांचा अपमान होतोय तुम्ही सहन करता हे असले बाळासाहेबांचे विचार नाहीत – उद्धव ठाकरे
-
ज्योतिषाला हात दाखवता, आज शहीद दिवस हे नवस फेडायला. शेतकऱ्यासाठी वेळ नाही. शेतकऱ्यांना पीकविमा मिळेना. मी नागपूर अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. माध्यमांसमोर शेतकऱ्यांना विचारले – उद्धव ठाकरे
-
अन्नदाता शेतकरी विचारतो खायचं काय? पंतप्रधान म्हणतात मी दोन-तीन किलो शिव्या खातो. तुम्ही शिव्या खाऊन जगता ते ठिक आहे, पण शेतकऱ्यांचं काय? – उद्धव ठाकरे
-
मागे मोर्चा काढला तर विमावाले वठणीवर आले. आता पुन्हा त्यांना वठणीवर आणावं लागेल – उद्धव ठाकरे
-
देवेंद्र फडणवीसांचे जुने विधान ऐका. फडणवीसांनी जनाची नाही, तर मनाची लाज बाळगावी – उद्धव ठाकरे
-
मी आव्हान देतो, तुम्ही सत्तेत आहात ना वीजबिल माफ करा. वर वेगळी भाषा, खाली वेगळी भाषा वापरता – उद्धव ठाकरे
-
पश्चिम विदर्भाचा काही भाग राहिला हे मला माहिती आहे. अतिवृष्टीचे पैसे घोषित झाले, मात्र किती लोकांना मिळाले हे चॅनलवाल्यांनी दाखवावे. खोटे बोलून रेटून न्यायचे प्रयत्न सुरू आहे – उद्धव ठाकरे
-
मी तुमच्या संकटात उभे राहण्यासाठी आलो आहे. आत्महत्या करायची नाही – उद्धव ठाकरे
-
लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणून होणार नाही. ती पेलणार का? ती पेलण्याची ताकद शेतकरी मावळ्यांमध्ये आहे – उद्धव ठाकरे
-
एकीकडे छत्रपतींचा अपमान करतात आणि दुसरीकडे तलवार आणण्याची भाषा करतात – उद्धव ठाकरे
-
एका व्हिडिओत मुख्यमंत्री शेतीत रमल्याचं दाखवलं. मात्र हा हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री – उद्धव ठाकरे
-
मी करोना आणि शस्त्रक्रियेमुळे घरात बसूनही कामं केली. तुम्ही कुठे फिरता तर सुरत, गुवाहटी, गोवा – उद्धव ठाकरे
-
तुम्ही घेतलेले पन्नास खोके शेतकऱ्यांना दिले तर त्यांचे भले होईल – उद्धव ठाकरे
-
आपण हिंदुत्वावरुन कुणाला फसवले नाही. काश्मीरमध्ये भाजपा मेहबूबा यांच्याबरोबर गेला तेव्हा काय होतं? – उद्धव ठाकरे
-
मी काँग्रेस-राष्ट्रवादीला घेऊन धाराशिव आणि संभाजीनगर करुन दाखवले – उद्धव ठाकरे
-
बोक्यांना खोक्यांची भूक म्हणून हे गद्दारी करुन गेले. आज तात्पुरती सत्ता मिळाली, पण देशात तुमच्या कपाळावर गद्दाराची ओळख कायमची झाली – उद्धव ठाकरे
-
मनगटात ताकत किती असते हे शेतकऱ्यांनी केंद्राला दाखवून दिले. त्यांना अतिरेकी म्हटलं गेले. मात्र, त्यांच्या नांगराची ताकद प्रचंड होती – उद्धव ठाकरे
-
शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरेल हाथ वर करुन सांगा कितीही संकटे आली तरी आत्महत्या करणार नाही. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरा. केवळ हमीभाव नाही, हक्काचा भाव हवा – उद्धव ठाकरे
-
गद्दारांना धडा शिकवायचा, महाराष्ट्राचा अपमान, महाराजांचा अपमान सहन करायचा नाही – उद्धव ठाकरे (फोटो सौजन्य – उद्धव ठाकरे, शिवसेना ट्विटर आणि संग्रहित)
Devendra Fadnavis: सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाची दांडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार