-
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव प्रतिक पाटील आणि उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका यांचा शाही विवाह सोहळा रविवारी मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
या विवाहास राज्यातील अनेक मातब्बर नेते उपस्थित होते.
-
जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील हजारो लोकांनीदेखील या विवाह सोहळ्यास हजेरी लावली.
-
या विवाह सोहळ्यासाठी राजारामनगरमध्ये भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली होती.
-
वधू-वरास आशीर्वाद देण्यासाठी भव्य व्यासपीठही उभारण्यात आले होते.
-
या व्यासपीठावर मंदिर, घंटा यासह फुलांची नेत्रदीपक आरास रचण्यात आली होती.
-
लग्नसोहळ्यादरम्यान जयंत पाटील आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे आनंदाने स्वागत करत होते.
-
वधू-वरास आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हे नेते उपस्थित होते.
-
तसेच या विवाह सोहळ्यास प्रफुल पटेल, श्रीनिवास पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, उदयनराजे, छत्रपती शाहू महाराज, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत, रामराजे निंबाळकर या नेत्यांनीदेखील हजेरी लावली.
-
बाळासाहेब पाटील, संजयकाका पाटील, आदीसह मंत्री शंभूराजे देसाई, सुरेश खाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
-
जयंत पाटील यांच्याप्रमाणेच प्रतिक पाटील हेदेखील राजकारणात सक्रिय आहेत.
-
प्रतिक पाटील यांच्या पत्नी तथा राहुल किर्लोस्कर यांच्या कन्या अलिका या उच्चशिक्षित आहेत. (सर्व फोटो- ट्विटर, इन्स्टाग्रामवरून साभार)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO