-
गोवा सरकारतर्फे क्लीन-ए-थॉन मोहीम राबविण्यात येत आहे.
-
यादरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी या कार्यक्रमात स्वच्छता मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमातील काही छायाचित्रे आता समोर आली आहेत.
-
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांना भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. म्हणूनच हे समुद्रकिनारे स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.
-
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेते जॅकी श्रॉफ आणि करण कुंद्रा यांनी क्लीन-ए-थॉन उपक्रमाचा एक भाग म्हणून पणजीच्या मिरामार बीचवर स्वच्छता मोहिमेत भाग घेतला आणि मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला.
-
गोव्यातील पर्यटन दरवर्षी ११ टक्के दराने वाढत आहे आणि त्यामुळे गोव्याचे किनारे स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.
-
या स्वच्छता मोहिमेचा मुख्य उद्देश गोव्याचा संपूर्ण समुद्रकिनारा पुन्हा नयनरम्य बनवणे हा आहे.
-
एवढेच नाही तर ही स्वच्छता मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचे आणि स्वच्छ समुद्र, सुरक्षित समुद्र या अभियानाचे प्रतिबिंब आहे.
-
या उपक्रमाबद्दल एएनआयशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “गोव्यातील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही नेहमीच काम करतो आणि भविष्यातही आम्ही ते स्वच्छ ठेवू.”
-
याला जोडून अमृता फडणवीस म्हणाल्या, “मी फक्त गोवा सरकारला धन्यवाद म्हणेन. त्यांनी त्यांचे समुद्रकिनारे स्वच्छ ठेवले आहेत. हा एक रिकॉल आहे की आपण हे किनारे नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे आणि इतर लोकांनी याचे सौंदर्य राखायला हवे याकडे आपल्यालाच लक्ष द्यायचे आहे.”
-
या स्वच्छता मोहिमेसाठी या मंडळींसह काळ्या-पांढऱ्या रंगाचा गणवेश घातलेले अनेक जण समुद्रकिनाऱ्यावर जमून कचरा उचलत होते.
-
करण कुंद्रा म्हणाला, “इतके लोक आले याचा आनंद आहे. आम्ही गोव्यात येतो, चित्रीकरण करतो आणि छान आठवणी घेऊन परत जातो. हे सौंदर्य जपण्यासाठी आपण सर्वकाही करायला हवे.”
-
दरम्यान, जॅकी श्रॉफ यांनी लोकांना पृथ्वीला आपल्या आईप्रमाणे वागवण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, ‘पृथ्वी आपली माता आहे. फक्त तुमचे हृदय स्वच्छ ठेवा, देशभक्त व्हा आणि स्वच्छ रहा. आजूबाजूला कचरा टाकू नका.”

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?