-
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला याच्यावर दिल्लीत तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे.
-
आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेलं जात होतं. त्यावेळी हा तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
-
हल्ला करणाऱ्यांनीते हिंदू सेनेचे सदस्य असल्याचं सांगितलं.
-
या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं? याचा हा आढावा…
-
आफताबची श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी सकाळपासून दिल्लीत पॉलीग्राफी चाचणी सुरू होती.
-
चाचणी झाल्यानंतर आफताबला सायंकाळी पुन्हा तुरुंगात नेण्यात येत होतं.
-
त्याचवेळी तीन-चार जणांनी तलवार घेऊन येत गाडीवर हल्ला चढवला.
-
हल्लेखोर तलवारीने वार करत असताना त्यांना रोखण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने आपली बंदुक काढून हवेत गोळी झाडण्याचाही इशारा दिला.
-
मात्र, पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करूनही आरोपींनी तलवारींनी पोलीस व्हॅनवर वार करणे सुरुच ठेवले.
-
अखेर गाडी चालकाने हा हल्ला करण्याचा प्रयत्न होत असताना गाडी पुढे नेली.
-
पोलिसांनी हल्लेखोरांना आफताबपर्यंत पोहचू दिलं नाही. या हल्ल्यात आफताबला कोणतीही दुखापत झालेली नाही.
-
पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
-
हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने त्याची ओळख माध्यमांना हिंदू सेनेचा राज्याध्यक्ष कुलदीप ठाकूर अशी करून दिली.
-
हल्लेखोर कुलदीप ठाकूरने हा हल्ला करण्यामागील कारणं सांगितली. ती खालीलप्रमाणे,
-
जर आमच्या बहिणी आणि मुलीच सुरक्षित नसतील, तर आम्ही जगून काय करू? आम्ही आफताबला मारून टाकू – कुलदीप ठाकूर
-
मी दोन मुलींचा बाप आहे. आम्ही आफताबला तलवारने नाही, तर बंदुकीने गोळीही मारू – कुलदीप ठाकूर
-
आम्ही हिंदू सेनेचे सदस्य आहोत. आम्ही एकूण १० लोक आफताबवर हल्ला करण्यासाठी आलो होतो. मी कुलदीप ठाकूर हिंदू सेनेचा राज्याध्यक्ष आहे – कुलदीप ठाकूर
-
आरोपींवर कारवाई करणं हे पोलिसांचं काम आहे, देशात कायदा आहे, तुम्ही कायदा हातात घेणार का? असा प्रश्न पत्रकारांनी हल्लेखोरांना विचारला.
-
त्यावर हल्लेखोर ठाकूर म्हणाला, “पोलीस तर आरोपीला सुरक्षा देत आहेत.”
-
कायद्याने त्या मुलीला वाचवलं का? – कुलदीप ठाकूर
-
हे सर्वांना लक्ष्य करतात – कुलदीप ठाकूर
-
दोन मिनिटे त्याला गाडीबाहेर काढा. आम्ही त्याला फाडून टाकू – कुलदीप ठाकूर
-
त्याने कुणाच्या तरी मुलीला मारलं आहे. त्याने त्या मुलीचे ३५ तुकडे केले आहेत – कुलदीप ठाकूर
-
आरोपींकडून पोलिसांनी तलवारी जप्त केल्या. (सर्व फोटो सौजन्य – एएनआय, लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पुणेकरांचा नादखुळा! भारताच्या दणदणीत विजयानंतर पुण्यात FC रोडवर हजारो क्रिकेट फॅन्सनी काय केलं पाहा; VIDEO झाला व्हायरल