-
फोर्ब्सने नुकताच भारतातील १०० श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी हे पहिल्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही १,२११,४६०.११ कोटी रुपये एवढी आहे.
-
दुसऱ्या स्थानावर रिलायन्स ग्रुपचे प्रमुख मुकेश अंबानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ७१०,७२३.२६ कोटी रुपये आहे.
-
या यादीत तिसऱ्या स्थानावर डीमार्टचे मालक राधाकृष्ण दमानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती २२२,९०८.६६ कोटी रुपये एवढी आहे. त्यांनी २००२ साली डीमार्टची सुरूवात केली होती. आज देशभरात २७१ डीमार्ट स्टोअर आहेत.
-
फोर्ब्सच्या यादीत चौथ्या स्थानावर सीरम इंस्टिट्यूटचे प्रमुख सायरस पुनावाला आहेत. त्यांची एकूण संपत्ती १७३,६४२.६२ कोटी आहे.
-
एचसीएल टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष शिव नादर हे फोर्ब्सच्या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १७२,८३४.९७ कोटी रुपये आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी यावर्षी शिक्षण क्षेत्रासाठी ६६२ मिलीयन डॉलर एवढी संपत्ती दान केली आहे.
-
ओपी जिंदल ग्रुपच्या अध्यक्षा सावित्री जिंदल या फोर्ब्सने जारी केलेल्या यादीत पहिल्या दहा उद्योगपतींमध्ये एकमेव महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती १३२,४५२.९७ कोटी रुपये आहे.
-
सन फार्मास्युटीकल्सचे संस्थापक दिलीप सांघवी हे पहिल्या दहा उद्योगपतींच्या यादीत सातव्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १२५,१८४.२१ कोटी रुपये एवढी आहे.
-
हिंदूजा ग्रुपची सुरूवात परमानंद दीपचंद हिंदूजा यांनी १९१४ मध्ये केली होती. आज त्यांच्या उद्योग श्रीचंद, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक हे भाऊ मिळून चालवतात. त्यांची एकूण संपत्ती ही १२२,७६१.२९ कोटी रुपये आहे. तसेच या यादीत नऊव्या स्थानावर बिरला ग्रुपचे अध्यक्ष आदित्य बिरला आहेत. त्यांची १२१.१४६.०१ कोटी रुपये एवढी आहे.
-
तर दहाव्या स्थानावर बजाज परिवार आहे. जमनालाल बजाज यांनी ९६ वर्षांपूर्वी व्यवसायाला सुरुवात केली होती. आज बजाज परिवाराकडे ४० कंपन्यांचे नेटवर्क आहे. त्यांची एकूण संपत्ती ११७,९१५.४५ कोटी रुपये आहे.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”