-
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकारपरिषद घेत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर टीका केली. “सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या नेत्यांना सत्ता गेल्याने नैराश्य आलेलं आहे.ते निराश झालेले आहेत, त्यामुळे जनतेत भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.” असं ते म्हणाले.(सर्व- फोटो संग्रहित)
-
“शरद पवार चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आता अडीच वर्ष असल्यासारखे होते, तेव्हा ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न संबंधी एकही शब्द बोलले नाहीत.”
-
“आता मात्र विरोधी पक्षात गेल्यानंतर रोज काहीतरी बोलावसं वाटतं. आता संजय राऊतांचं कमी झालं आणि शरद पवार रोज बोलायले लागले.”
-
“शरद पवार तुमचं काही मतं असो परंतु या महाराष्ट्राचं मत महाराष्ट्रातील एकही इंच जागा कर्नाटक काय कुठल्याही राज्याला देऊ नये असं आहे.”
-
“सत्तेवरून गेल्यावर सध्या अनेकजण सध्या सीमाभागाबद्दल बोलत आहेत.”
-
“आंदोलनं आणि उद्धव ठाकरेंचा काहीच संबंध नाही. ते कधी आंदोलनासाठी आले, त्यांनी पाहीलं, त्यांनी सहभाग घेतला असं झालं नाही.”
-
“शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचं काहीच योगदान नाही.”
-
“मराठी माणसावर जर कुठे अन्याय होतोय, दंगल होतोय, मराठी माणूस मार खातोय तर तिथे हे कधीच आयुष्यात गेले नाहीत. ”
-
“स्वातंत्र्यवीर सावरकरांना आम्ही दैवत मानतो. मग त्यांच्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांना जो आदर होता, सावकरांबद्दल सन्मान होता तो उद्धव ठाकरेंना आहे का?”
-
“सावरकरांबद्दल ज्यांनी उच्चार काढले ते राहुल गांधी महाराष्ट्रात आले आणि आदित्य ठाकरेंना मिठी मारून परत गेले.”
-
“जे उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जवळ गेले, मुख्यमंत्री झाले त्यांनी हिंदू हा शब्द उच्चारू नये. ”
-
“हिंदुत्वाशी गद्दारी केली असं मी म्हणेन. म्हणून सावरकरांची माफी कितीवेळा जरी मागितली तरी ते आता काही भरून येणार नाही.”
-
“आता भारत जोडो आठवला, पण एवढ्या वर्षात भारत का जोडला नाही?
-
“तुम्ही आत्मनिर्भर बनवला असता, तुमच्या पक्षाने जर महासत्तेकडे वाटचाल केली असती तर बोलायची गरज नाही.”
-
“आता ही वाताहाता आणि एवढं जोडोसाठी फिरावं लागलं नसतं. काय झालं जोडून?”
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO