-
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावर असताना गुरुवारी (१ डिसेंबर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली.
-
त्यावेळी त्यांनी सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून सुरू असलेल्या वादापासून इतिहास लेखन आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटापर्यंत अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.
-
राज ठाकरेंच्या याच पत्रकार परिषदेतील महत्त्वाच्या मुद्द्यांचा हा आढावा…
-
आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही – राज ठाकरे
-
आपल्या इतिहासातील गोष्टी पोर्तुगीज, मोघल, ब्रिटिशांकडून आल्या आहेत – राज ठाकरे
-
महाराजांच्या काळातील एक ग्रंथ म्हणजे शिवभारत. त्यात ज्या गोष्टी सापडतात त्या आपल्यासमोर आहेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे काही दाखले, पत्रच नाहीत – राज ठाकरे
-
सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याशिवाय तुम्ही इतिहास दाखवूच शकत नाही – राज ठाकरे
-
फक्त इतिहासाला धक्का लागणार नाही हे बघणं गरजेचं आहे. अशाप्रकारे शिवरायांना धक्का लावणारा मायेचा पूत अजून जन्माला यायचा आहे – राज ठाकरे
-
जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे – राज ठाकरे
-
सध्या जातीतून इतिहास पाहण्याचं पेव फुटलं आहे – राज ठाकरे
-
ठराविक मुठभर लोकच जातीतून इतिहास पाहत आहेत – राज ठाकरे
-
जातीतून इतिहास पाहणाऱ्यांचा राजकीय स्वार्थ आहे – राज ठाकरे
-
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात दिग्दर्शकाने सहा जणांची नावं टाकली, पण आतापर्यंत आपण जी नावं ऐकली ती सर्व काल्पनिक नावं आहेत – राज ठाकरे
-
इतिहासाचे अभ्यासक गजानन मेहंदळे यांच्यानुसार, प्रतापराव गुजर यांच्याबरोबर कोणत्या नावाचे कोण लोक होते याविषयी जगातल्या कोणत्याही इतिहासाच्या पानावर कोठेही लिहिलेलं नाही – राज ठाकरे
-
इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनीही मला गजानन मेहंदळे बरोबर बोलत असल्याचं सांगितलं – राज ठाकरे (सर्व छायाचित्र संग्रहित)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही