-
शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. शिंदे गटात लवकरच स्फोट होईल, असं मोठं विधानही त्यांनी केले.
-
यावेळी बोलताना त्यांनी जे आमदार खासदार शिवसेना सोडून गेले त्यांच्या कपाळावर ‘गद्दार’ असा शिक्का बसला आहे, असे ते म्हणाले.
-
ज्याप्रकारे दिवार सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’, असे लिहिले होते, उद्या यांची मुले हातावर गद्दार नोंदवून घेतील. यांच्या मुलांना आणि नातेवाईकांना लोकं गद्दारांचे नातेवाईक म्हणतील, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
-
या आमदारांच्या कपाळावर गद्दार हे शब्द कोरले गेले आहेत. त्यांच्या पिढ्यांपिढ्यांना ही गद्दारी आता शांतपणे जगू देणार नाही, असेही ते म्हणाले.
-
यावेळी पत्रकारांनी दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्यातील मदभेदाबाबत विचारले असता, ”मी खासदार असलो, तरी त्यापूर्वी एक क्राईम रिपोर्टर आहे. माझा पिंड पत्रकाराचा आहे. त्यामुळे कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे, ते मला चांगलं कळतं. शिंदे गटात काय सुरू आहे, हे मला माहिती आहे आणि लवकरच त्याचा स्फोट होईल”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
-
काल वैजापूरच्या आमदाराला लोकांनी गावातून बाहेर काढले. सगळीकडे हीच परिस्थिती आहे. आज त्यांचे सरकार आहे, त्यामुळे त्यांना सुरक्षा मिळाली आहे. या आमदारांचे भविष्य मला काही चांगलं दिसत नाही, असेही ते म्हणाले.
-
काही आमदार सोडून गेले म्हणून शिवसेना संपली असं होतं नाही. ४० नेते गेले असले तरी, पक्ष जमीनीवर आहे. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी तुम्ही निवडणुका घेतल्या, तरी आम्ही जिंकून येऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
-
महानगरपालिका असेल किंवा अन्य निवडणुका असतील या निवडणुका भीतीपोटी टाळल्या जात आहेत. शिवसेना नवीन चिन्हावरसुद्धा विजयी होईल, शिवसेनेला कुठेही तडा गेलेला नाही, असेही ते म्हणाले.
-
दरम्यान, त्यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरून शिंदे गटावर टीका केली. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने कर्नाटकने सोडलेल्या अतिरिक्त पाण्यात जलसमाधी घेतली पाहिजे. महाराष्ट्रावर असं आक्रमण गेल्या ५० वर्षांत कधी झालं नव्हतं. बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री तुम्हाला सरळ डिवचतो आहे. या महाराष्ट्राला आव्हान देतो आहे. त्यामुळे तुमच्यात स्वाभिमान असेल तर जे पाणी सोडले आहे, त्यात जलसमाधी घ्या”, असे ते म्हणाले.

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल