-
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहेत.
-
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व समर्थक आमदारांसह पुन्हा एकदा गुवाहाटीला जात कामाख्या देवीचे दर्शन घेतले. याच मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे गटातील नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटातील आमदारांवर गंभीर आरोप केले.
-
आमदारांना खूश ठेवण्यासाठी गुवाहाटीमध्ये प्रत्येकाला पाच कोटी रुपये देण्यात आले, असे खैरे म्हणाले आहेत. खैरेंच्या याच दाव्यानंतर शिंदे गटातील नेते तथा मंत्री संदिपान भुमरे आक्रमक झाले आहेत.
-
खैरे यांनी २०२४ ची निवडणूक जिंकून दाखवावी, असे जाहीर आव्हान भुमरे यांनी दिले आहे.
-
चंद्रकांत खैरे फक्त पूजा करतात. फक्त पूजा करून निवडून येता येत नाही. त्यासाठी काम करावे लागते. खेरै यांनी मागील ३०-३५ वर्षांत फक्त पूजा केली. आम्हीही पूजापाठ करतो. – संदिपान भुमरे
-
भावनिक आवाहन करून आतापर्यंत चंद्रकांत खैरे निवडून आलेले आहेत. चंद्रकांत खैरे यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवावी. – संदिपान भुमरे
-
त्यांनी या निवडणुकीत विजयी होऊन दाखवावे. २०१९ साली त्याने अनेक यज्ञ केले होते. – संदिपान भुमरे
-
मग त्यांचा पराभव का झाला. खैरे २०२४ च्या निवडणुकीत उभे राहिले तर त्यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे, असा दावा संदिपान भुमरे यांनी केला. – संदिपान भुमरे
-
चंद्रकांत खैरे यांना पैशांशिवाय काहीही दिसत नाही. देवदर्शनाला गेलं तरी त्यांना आम्हाला कोणीतरी पाच कोटी रुपये दिल्याचे वाटते. – संदिपान भुमरे
-
पाच कोटी द्यायचे असतील तर तिकडे जाण्याची गरज नव्हती. आमच्यातील एकही माणूस पैसे घेणारा नाही. – संदिपान भुमरे
-
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर आम्ही सर्व आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला येऊ, अशी आम्ही यापूर्वी म्हणालो होतो. म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा गुवाहाटीला गेलो होतो. – संदिपान भुमरे
-
आम्हाला पैसे दिल्याचे खैरे यांनी सिद्ध करून दाखवावे, असे खुले आव्हान भुमरे यांनी दिले. (सर्व फोटो- फेसबुकवरून साभार)
६ एप्रिल पंचांग: रामनवमी कोणत्या राशीसाठी ठरणार भाग्यशाली? कोणाला मिळणार प्रेम, पैसा आणि प्रसिद्धी? वाचा राशिभविष्य