-
शिंदे सरकारचे स्टेअरिंग भाजपाच्या हाती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती असल्याची टीका विरोधक नेहमी करतात.
-
पण, रविवारी समृध्दी महामार्गाच्या पाहणी दौ-याच्या निमित्ताने प्रत्यक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचे पाहायला मिळाले.
-
११ डिसेंबरला समृध्दी महामार्गाच्या ५२० किलोमीटर नागपूर- शिर्डी पर्यतच्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.
-
त्यापूर्वी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-शिर्डी मार्गाचा पाहणी दौरा नागपूरपासून सुरू झाला. त्यावेळी शिंदे आणि फडणवीस हे एकाच गाडीतून दौ-यासाठी निघाले. तर, फडणवीस गाडी चालवत होते.
-
रस्याचे काम सुरू असताना शिंदे यांनी या मार्गावर गाडी चालवली. आता मी चालवत आहे, असे फडणवीस म्हणाले.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी या महामार्गावर जवळपास १५० किमी वेगाने गाडी चालवली.
-
नागपूर ते शिर्डी असे ५२९ किलोमीटर अंतर त्यांनी अवघ्या पावणे पाच तासात पार केलं.
-
नागपूरहून शिर्डीच्या दिशेने मुख्यमंत्र्यांचा ताफा साडेबारा वाजता निघाला होता. सायंकाळी पाच ते सव्वापाच वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ताफा शिर्डीत पोहचला.
-
या पाहणी दौ-यात रस्ते विकास महामंडळ, महसूल, पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार