-
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावर असताना रविवारी (४ डिसेंबर) रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. त्यातील महत्त्वाच्या वक्तव्यांचा आढावा…
-
मी यावेळी कोकण दौऱ्यात येथील नागरिकांना भेटतोय, त्यांच्याशी बोलतोय, तेव्हा मला त्यांच्या देहबोलीत एक सकारात्मकता दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल त्यांच्या मनात असलेल्या अपेक्षा आणि विश्वास दोन्ही मला जाणवतोय – राज ठाकरे
-
मी पुन्हा जानेवारीत येणार आहे. त्यावेळेला एक सभा कुडाळ आणि एक सभा रत्नागिरी जिल्ह्यात देणार आहे – राज ठाकरे
-
सध्या महाराष्ट्रात महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष जाऊ नये, एकूणच व्यवस्थेच्या अपयशाकडे लक्ष जाऊ नये म्हणून, फुटकळ मुद्दे काढून त्यावर एकमेकांची उणीदुणी काढणं सुरू आहे. माध्यमं पण हे दाखवून त्याला खतपाणी घालत आहेत – राज ठाकरे
-
छत्रपती शिवाजी महाराजांकडून कोणीतीही प्रेरणा घ्यायची नाही, त्यांच्याकडून काही शिकायचं नाही. फक्त वाद वाढतील हेच बघायचं हे सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. त्यात पुन्हा इतिहासाबद्दल समज नसणारे पण त्या विषयात बोलायला लागले आहेत – राज ठाकरे
-
इतिहास तसा रुक्ष असतो. त्यामुळे इतिहास जर लोकांच्या पर्यंत पोहचवायचा असेल तर थोडा रंजक करावा लागतो – राज ठाकरे
-
सिनेमातून इतिहास मांडताना, ज्यांच्यावर सिनेमा बनवला जात असेल त्यांच्यावर जर डाग लागत नसेल आणि इतिहासातील तथ्यांना धक्का लागत नसेल तर तो थोडा रंजक करून मांडायला हरकत नसावी – राज ठाकरे
-
रिफायनरीसारखे प्रकल्प कोकणात येऊ नये अशी माझी भूमिका होती, पण सद्य परिस्थितीत इतके मोठे प्रकल्प राज्याबाहेर जाणं हे राज्याच्या आणि कोकणच्या हिताचं नाही – राज ठाकरे
-
कोकणात जेव्हा प्रकल्पांची घोषणा झाली, तेव्हा आपल्या जमिनी प्रकल्पांसाठी कवडीमोल भावाने विकत घेतल्या हे कोकणी माणसाला कळलं – राज ठाकरे
-
हजारो एकर जमिनी जेव्हा बाहेरची माणसं विकत घेत होते, तेव्हा इथल्या स्थानिक माणसाला एकदाही वाटलं नाही, की हो कोण माणसं आहेत, ती जमिनी का विकत घेत आहेत? – राज ठाकरे
-
आज जमिनी हातातून निघून गेल्यावर बोलून काय उपयोग? किमान यापुढे जमिनी विकताना दहावेळा विचार करा – राज ठाकरे
-
वर्षानुवर्षे कोकणाचा विकास न करणारे, साधा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करू शकणाऱ्यांना आजपर्यंत कोकणी माणसांनी निवडून दिलं. पण आता त्यांना नाकारून एक नवा पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाने उभा राहत आहे, जो कोकणाच्या विकासासाठी लढेल – राज ठाकरे (सर्व छायाचित्र – संग्रहित/ट्विटर)

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल