-
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज ( ५ नोव्हेंबर ) दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये मतदान केलं.
-
मात्र, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या झंझावाती प्रचारावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
-
भाजपाने गुजरातची निवडणूक कोणत्याही प्रचाराविना जिंकायली हवी होती. मात्र, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांचा गुजरातमध्ये प्रचारासाठी ठाण मांडून बसावं लागलं. यामुळे निकाल काय लागेल सांगून शकत नाही.
-
तसेच, मशीनमध्ये गडबड करून किती गडबड करणार. लोकांचा निवडणूक यंत्रणेवर विश्वास राहिला नाही, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
-
गुजरातमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्री प्रचार करत असल्याचं दोन महिन्यांपासून पाहत आहे. पंतप्रधान आपला पूर्णवेळ गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी देत आहेत.
-
गुजरातमध्ये तीन वेळा भाजपाची सत्ता असूनही प्रचारासाठी पंतप्रधानांना का यावं लागत आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
-
गुजरात तुम्ही बनवला आहे, असं म्हणता तरी आजही तुम्हाला प्रचाराला उतरावं लागतलं.
-
कोणत्याही प्रचाराविना निवडणूक जिंकायला हवी होती. परंतु, तशी परिस्थिती नाही, याची कल्पना तुम्हाला आहे.
-
त्यामुळे प्रचारासाठी एवढा घाम गाळावा लागत आहे, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.

घटस्फोटानंतर अडीच महिन्यांनी मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे निधन, म्हणाली, “मला थोडा…”