-
जर्मनीच्या विदेशमंत्री अॅनालेना बिअरबॉक या सोमवार पासून दोन दिवसीय भारत दोऱ्यावर आहेत.
-
अॅनालेना बिअरबॉक यांचा पहिलाच भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून सोमवारी त्यांनी जुन्या दिल्लील विविध ठिकाणी भेट दिली.
-
तत्पूर्वी, भारत आणि जर्मनी यांच्यात सोमवारी विविध विषयावर चर्चा झाली. यामध्ये दहशदवाद हा महत्त्वाचा मुद्दा होता. तसेच भारत आणि जर्मनी यांच्यात विविध करांरांवरही स्वाक्षरी करण्यात आल्या.
-
दरम्यान, अॅनालेना बिअरबॉक यांनी जुन्या दिल्लीतील चांदणी चौक आणि पराठवाला गल्लीलाही भेट दिली.
-
यावेळी त्यांनी सिसगंज साहिब गुरुद्वाऱ्यात प्रार्थनाही केली.
-
त्यानंतर लंगरमध्ये जाऊन चपाती करण्यास मदत केली.
-
तसेच त्यांनी दिल्लीतील ई-रिक्षात प्रवासाचाही आनंद घेतला. यावेळी अनेक रिक्षावाल्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
-
दरम्यान, किनारी बाजार येथे जाताच त्यांना खादीचे कपडे कपडे बघण्याचा मोह आवरला नाही. यावेळी त्यांनी येथील दुकानदारांशी चर्चा करत भारतीय कपड्यांविषयी माहिती घेतली.
-
याबाबत फोटो त्यांनी ट्वीटरवरही शेयर केले. हा माझा पहिला भारत दौरा असून भारताविषयी आपुलकी निर्माण झाल्याची, प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘ठरलं तर मग’मध्ये एन्ट्री घेणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता! यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो