-
भाजपाला गुजरात विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला.
-
मात्र, दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं गृहराज्य हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचा दारूण पराभव झाला.
-
हिमाचलचा भाजपाचा पराभवही चांगलाच चर्चेत आहे. यावरून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
-
या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय झाला, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले असा प्रश्न विचारला.
-
पत्रकारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भूमिका मांडली. तसेच इतरही मुद्द्यांवर भाष्य केलं. त्याचा हा आढावा.
-
हे खरं आहे की हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही – देवेंद्र फडणवीस
-
हिमाचलमध्ये एक प्रथा राहिली आहे की, दर पाच वर्षांनी सरकार बदलतं – देवेंद्र फडणवीस
-
यावर्षी आम्ही हा ट्रेंड रोखू शकू अशी आम्हाला आशा होती – देवेंद्र फडणवीस
-
हिमाचलमध्ये मिळालेली मतं चांगली आहेत. जवळपास ४२ टक्के मतं भाजपाला आहेत – देवेंद्र फडणवीस
-
काँग्रेसला आमच्यापेक्षा केवळ एक टक्का मते जास्त आहेत. मात्र, या एक टक्के मतांमुळे काँग्रेसला बहुमत मिळालं – देवेंद्र फडणवीस
-
त्यामुळे यावेळी बदलाचा हा ट्रेंड रोखता रोखता आम्ही राहिलो – देवेंद्र फडणवीस
-
एक टक्का अधिक मतं मिळाली असती तर हा ट्रेंड मोडला असता – देवेंद्र फडणवीस
-
असं असलं तरी हिमाचल प्रदेशमध्ये निवडून आलेल्या जागा कमी नाहीत, चांगल्याच जागा मिळाल्या आहेत – देवेंद्र फडणवीस
-
भाजपा यानंतर अधिक मेहनत करेल – देवेंद्र फडणवीस
-
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीला एक अभूतपूर्व विजय मिळाला आहे. सर्व प्रकारचे रेकॉर्ड हे भाजपाने तोडले आहेत – देवेंद्र फडणवीस
-
सर्वात महत्वाचे २७ वर्षे राज्य केल्यानंतर इतक्या रेकॉर्ड जागा जेव्हा जनता देते, याचा अर्थ गुजरातच्या जनतेला हा विश्वास आहे की गुजरातमध्ये जे परिवर्तन झाले ते मोदींनी, भाजपाने केले. पुढेही भाजपाच गुजरातच्या हिताचे निर्णय करू शकते – देवेंद्र फडणवीस
-
मोदींच्या नेतृत्वातच देश पुढे जाऊ शकतो हा विश्वास गुजरातच्या जनतेने या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिला – देवेंद्र फडणवीस
-
५२ टक्के मते भाजपाला मिळाली. आत्तापर्यंतचे कल आणि विजयी जागा पाहता १५७ जागा भाजपा जिंकले आहे किंवा पुढे आहे – देवेंद्र फडणवीस
-
कॉंग्रेसच्या आजपर्यंतच्या इतिहासात गुजरातमध्ये १६ जागा हा निचांक आहे – देवेंद्र फडणवीस
-
ज्यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला आणि आम्ही निवडून येणार असे लेखी दिले, अशा आप नावाच्या पार्टीचे पुरते बारा वाजले. त्यामुळे आप दिल्लीपुरती मर्यादीत पार्टी असल्याचे गुजरातने दाखवून दिले – देवेंद्र फडणवीस
-
मीदेखील त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो. त्यावेळीच जनतेचा मूड अतिशय स्पष्ट दिसत होता. गुजरात ‘मोदीमय’, ‘भाजपामय’ होते. जनतेने मूड बनवलेला होता – देवेंद्र फडणवीस
-
मी ज्या-ज्या ठिकाणी सभांना गेलो तिथे, मोदींचे नाव घेतल्यावर जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा त्यातूनच लोकांची मानसिकता लक्षात यायची – देवेंद्र फडणवीस
-
मी मागेदेखील सांगितले की, उद्धव ठाकरेंजवळ अस्त्र आहे, जे ब्रह्मास्त्रापेक्षा प्रभावी आहे. ते म्हणजे ‘टोमणेअस्त्र’. टोमणे मारल्याशिवाय त्यांचे कुठलेही वाक्य पूर्ण होऊ शकत नाही – देवेंद्र फडणवीस
-
एकाच गोष्टीचा आनंद आहे की, उद्योगाचे महत्व उद्धव ठाकरेंना कळायला लागले. कारण महाराष्ट्रातले उद्योग घालवणारे तेच आहेत – देवेंद्र फडणवीस
-
रिफायनरीसारखा महाराष्ट्रातला प्रोजेक्ट जो देशातला सर्वात मोठ्या गुंतवणूकीचा, रोजगाराचा होता तो उद्धव ठाकरेंनी बाहेर घालवला – देवेंद्र फडणवीस
-
मला असे वाटते की, कधीतरी असा विजय मिळाल्यानंतर विरोधी विचाराच्या लोकांचेही तोंडभरून कौतूक करायचे असते. मात्र, अजून ते त्या मानसिकतेपर्यंत पोहोचलेले दिसत नाहीत – देवेंद्र फडणवीस
-
अजूनही महाराष्ट्रात जे काही घडले त्याचा परिणाम उद्धव ठाकरेंच्या मनावर मला दिसतो आहे – देवेंद्र फडणवीस
-
मुंबई महानगरपालिकेवर भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आणि आमचे मित्रपक्ष या आमच्या महायुतीचा झेंडा निश्चितपणे लागेल हा मला विश्वास आहे – देवेंद्र फडणवीस
-
एकूणच फडणवीसांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीवर बोलताना सर्वच विषयांवर भाष्य केलं. तसेच विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.
-
(सर्व फोटो – संग्रहित)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”