-
भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, असं वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय.
-
महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांनी चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा निषेध केला.
-
राज्यात ठिकठिकाणी या वक्तव्याविरोधात आंदोलन-मोर्चेही झाले.
-
अशातच शनिवारी (१० डिसेंबर) या वक्तव्याचा निषेध करत पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली.
-
या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हात जोडून विनंती करत पोलिसांवर निलंबनाची कारवाई करू नये, असं म्हटलं.
-
चंद्रकांत पाटील यांनी नेमकं काय म्हटलं याचा हा आढावा…
-
चंद्रकांत पाटील म्हणाले याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील – चंद्रकांत पाटील
-
मात्र, या चौकशीत कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करून त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं कारण नाही – चंद्रकांत पाटील
-
मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना जाहीरपणे हात जोडून विनंती करतो की, या प्रकरणात एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याचा दोष असला, तरी त्या कर्मचाऱ्याला निलंबित करू नये – चंद्रकांत पाटील
-
मी त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही – चंद्रकांत पाटील
-
मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे म्हणतील ते करायचं आहे – चंद्रकांत पाटील
-
बावनकुळे म्हटले निदर्शने करा, तर करा. ते म्हणाले उद्या महाराष्ट्रात मोदी आहेत, म्हणून कोणीही प्रतिक्रिया द्यायची नाही, तर कोणीही प्रतिक्रिया द्यायची नाही – चंद्रकांत पाटील
-
पुण्याहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते निघाले आहेत. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला माझी शपथ आहे – चंद्रकांत पाटील
-
कोणीही इथं येऊ नका. सर्वजण आपआपल्या ठिकाणी परत जा – चंद्रकांत पाटील
-
माझा एक कार्यकर्ता फोनवर रडायला लागला, म्हणाला की मी परत जाणार नाही – चंद्रकांत पाटील
-
मी त्याला सांगितलं की, परत जावं लागेल. माझ्या शपथेला काय अर्थ आहे – चंद्रकांत पाटील
-
मी पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो की, कायदा हातात घेऊ नका – चंद्रकांत पाटील
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा हातात घ्यायला आपल्याला शिकवलं नाही – चंद्रकांत पाटील (सर्व फोटो व्हिडीओतून साभार)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ