-
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
-
हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी ५ तासांत कापता येईल.
-
समृद्धी महामार्ग उद्घाटनाचे मुहूर्त यापूर्वी अनेकदा ठरले. मात्र, विविध कारणांमुळे उद्घाटन लांबणीवर पडत होते.
-
त्यापूर्वी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-शिर्डी मार्गाची पाहणी केली.
-
यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे एकाच गाडीतून दौऱ्यासाठी निघाले होते. तसेच फडणवीस यांनी गाडी चालवली होती.
-
मुख्यमंत्री-उपमुख्यंत्र्यांच्या या ड्राईव्हची सर्वत्र चर्चा सुरू असताना पंतप्रधान मोदी यांनीही या ड्राईव्हबाबत विचारणा केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात दिली.
-
“यापूर्वीही मी समृद्धी महामार्गावर गाडी चालवायचा अनुभव घेतला होता. मात्र, रविवारी देवेंद्र फडणवीसांचा ड्राईव्ह करायचा मुड होता. त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं.”
-
“सुरुवातीला थोडी धाकधूक वाटली, पण देवेंद्र फडणवीस गाडी चालवण्यात एक्सपर्ट आहेत.”
-
“आमच्या या ड्राईव्ह बाबत पंतप्रधान मोदींनीही विचारणा केली होती. मी दिल्लीत गेलो, तेव्हा त्यांनी मला याबाबत विचारलं होते”, असे ते म्हणाले.
-
दरम्यान, “या समृद्धी महामार्गावर प्राण्यांसाठी आम्ही ९२ ठिकाणी अंडरपास तर आठ ओव्हरपास केले आहेत.”
-
“वन्यजिवांना आपण जंगलाच्या बाहेर आलोय, असं वाटू नये यासाठी आम्ही ३५० कोटी रुपये खर्च करून झाडे लावली आहेत”, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
-
“वन्य जीवांना त्रास न देता, पर्यावरणाचा विचार करून हा महामार्ग बनवण्यात आहे. हे खरोखर आव्हानात्मक काम होते”, असेही ते म्हणाले.

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार