-
“निवडून देण्याचा जसा अधिकार आहे, तसं परत बोलावण्याचा अधिकारही मतदाराला असला पाहिजे.” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज एका कार्यक्रमातील भाषणातून त्यांनी मोदी सरकार व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. (सर्व फोटो -संग्रहित)
-
“आज आपल्या देशात न्याययंत्रणा सुद्धा हे सरकार आपल्या बुडाखाली घ्यायला पाहत आहे.”
-
“पंतप्रधान जर का न्यायमूर्ती नेमणार असतील, तर मग न्यायमूर्ती नेमण्याचं नाटक तरी कशाला करत आहात?”
-
“तुम्ही आम्हाला मतं देऊन निवडून देत असाल, तर तुमच्या मताची किंमत ही खोक्यांमध्ये नाही, तर भावनेमध्ये झाली पाहिजे.”
-
“आता तुम्ही दिलेलं मत कुठे जाणार आणि कुठून कुठून जाणार, हे तुम्हाला तरी कळतं का?” असं म्हणत शिंदे गटाला सुरत, गुवाहाटी दौऱ्यावर टोला लगावला आहे.
-
“लोकशाहीचा अर्थ हा जर का अशा पद्धतीने लागणार असेल, तर मग त्याच्यापेक्षा एकदाच जाहीर करा की देशातली लोकशाही संपली आहे.”
-
“तरूण-तरुणींनी राजकारणात आलंच पाहिजे. कारण तुम्हीच तर उद्याचं भवितव्य आहात.
-
“राजकारणी आणि साहित्यिक या दोघांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे.”
-
“मतदरांपासून मतदान हे गुप्त व्हायला लागलेलं आहे. असं कसं काय चालणार? ”
-
“छत्रपती शिवाजी महाराजांनी माता-भगिनींचा मान राखायला शिकवलं, पण त्यांच्याच महाराष्ट्रात एका महिलेचा अपमान करणारा मंत्री अजूनही मंत्रीमंडळात आहे.”
-
“फक्त भाषणं द्यायची, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि इथे महिलेचा अपमान केला, तर त्याकडे दुर्लक्ष करायचं. अजिबात नाही चालणार. ”
-
“पंतप्रधानांनी उद्याच्या कार्यक्रमात जरूर बोलावं. पण त्यांनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अरेरावी यावर बोललंच पाहिजे. ”

“ही फक्त गुढीपाडव्याला दिसते..” मुंबईच्या या सुंदर तरुणीची सोशल मीडियावर एकच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल