-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (११ डिसेंबर) मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं.
-
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्याचा मान गजवक्र नावाच्या ढोलताशा पथकाला मिळाला होता.
-
यावेळी मोदींनी स्वतः या पथकातील एक वादकाच्या खांद्यावर हात ठेऊन ढोलवादनाचा आनंद घेतला.
-
तसेच या मुलाशी संवादही साधला.
-
अमित विजय वेधे असं या ढोल वाजवणाऱ्या मुलाचं नाव आहे.
-
त्या दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला याविषयी त्या मुलाला विचारण्यात आलं.
-
तेव्हा ढोलवादक तरुणाने याविषयी माहिती दिली. तो एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होता.
-
मोदी काय बोलले या प्रश्नावर ढोलवादक मुलगा म्हणाला, “ते माझ्याकडे आले आणि तुझी काठी मला दे असं म्हटले.”
-
“मी त्यांना सांगितलं की याला काठी म्हणत नाही, तर टिपरू म्हणतात,” असं तरुणाने सांगितलं.
-
“त्यानंतर त्यांनी हे टिपरू घेऊन ढोल वाजवला,” अशी माहिती या तरुणाने दिली.
-
तो तरुण पुढे म्हणाला, “त्यावेळी त्यांनी मलाही दुसऱ्या बाजूने वाजव म्हटलं.”
-
“मोदींनी मला ढोल वाजवताना मजा येतेय का विचारलं,” असं त्याने सांगितलं.
-
“पंतप्रधान मोदींच्या प्रश्नावर मी हो म्हटलं,” असंही या तरुणाने सांगितलं.
-
“मोदींबरोबर ढोल वाजवल्याने फार छान वाटलं. पथकालाही खूप आनंद झाला,” अशी भावना या ढोलवादकाने व्यक्त केली.
-
“मोदी आमच्याकडे येऊन ढोल वाजवतील असं वाटलं नव्हतं. मात्र, ते आले आणि त्यामुळे आम्हाला फार छान वाटलं,” असंही या तरुणाने नमूद केलं. (सर्व छायाचित्र – देवेंद्र फडणवीस फेसबूक)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास