-
महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. त्यानंतर शाईफेक करणाऱ्यावर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
-
पोलिसांच्या या कारवाईवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही शाईफेक आणि गुन्हे दाखल करण्यावरून मत व्यक्त केलं.
-
यावेळी जितेंद्र आव्हाडांनी शाईफेकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेविषयी एक घटना सांगितली. त्याचा हा आढावा…
-
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करतानाचा फोटो/व्हिडीओ काढला म्हणून पत्रकारावर गुन्हा दाखल करणं हे अत्यंत चुकीचं आहे – जितेंद्र आव्हाड
-
पत्रकार हा पत्रकारचं काम करत असतो. फोटो काढणं हे छायाचित्रकाराचं काम असतं – जितेंद्र आव्हाड
-
आजच्या काळातील कॅमेरात मिनिटाला १०० फोटो निघतात – जितेंद्र आव्हाड
-
त्यामुळे कुणी जरा हललं तरी छायाचित्रकार काही वेळेत २००-३०० फोटो काढून निघून जातो – जितेंद्र आव्हाड
-
त्यामुळे शाईफेकीचा फोटो निघणारच होता. त्याने जाणूनबुजून किंवा प्लॅन करून करून असं होत नसतं – जितेंद्र आव्हाड
-
सरकारने इतक्या छोट्या मनाच असू नये. सरकारने मोठ्या मनाचा असावं लागतं – जितेंद्र आव्हाड
-
तुम्ही सत्ताधारी आहात. तुमच्या विरोधात आंदोलनं होणार, तुमच्या विरोधात निवेदनं येणार, तुमच्या विरोधात समाजात बोललं जाणार – जितेंद्र आव्हाड
-
अशावेळी सत्ताधाऱ्यांनी त्यावर टाकून ते प्रकरण थंड केलं पाहिजे. तसेच आपण कसे पुढे जाऊ हे बघायचं असतं – जितेंद्र आव्हाड
-
बिचाऱ्या फोटो काढणाऱ्या छायाचित्रकाराला सरकार अटक करतं. या महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाचं काही आहे की नाही? – जितेंद्र आव्हाड
-
शाईफेकीच्या कटात पत्रकाराचा सहभाग असल्याच्या चंद्रकांत पाटलांच्या आरोपावरही जितेंद्र आव्हाडांनी भूमिका स्पष्ट केली.
-
पत्रकार कुठल्याही कटात नसतात, ते आपलं काम करत असतात – जितेंद्र आव्हाड
-
माझ्याबाबत सांगतो, माझ्याविरोधात कट रचला गेला हे कसं उघड झालं, तर एका पत्रकाराने काढलेल्या फोटोमुळेच ते समोर आलं – जितेंद्र आव्हाड
-
तो व्हिडीओ नसता तर यांनी मला आणखी फसवलं असतं. फोटो व्हिडीओ काढणं हे पत्रकारांचं कामच आहे – जितेंद्र आव्हाड
-
अशा घटनांमध्ये पोलीस दोषी नसतात. पोलिसांना का लक्ष्य केलं जात आहे. यात पोलीस काय करणार आहेत? – जितेंद्र आव्हाड
-
गरीब बिचाऱ्या पोलिसांना निष्कारण अडचणीत आणलं जात आहे. त्यांना कामावरून काढायला लावलं जात आहे. माणुसकीतून विचार केला पाहिजे – जितेंद्र आव्हाड
-
शाईफेक करणारा आंदोलन करणारा आहे. आंदोलन करणारा जीवावर उदार होऊनच आलेला असतो. आंदोलन तसंच असतं – जितेंद्र आव्हाड
-
मी स्वतः एका डॉक्टरांच्या अंगावर शाई फेकली होती – जितेंद्र आव्हाड
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता ताईंनी होलीक्रॉसच्या प्राचार्यांच्या अंगावर शाई फेकली होती. तेव्हा आम्ही शरद पवार यांच्या शिव्याही खाल्ल्या होत्या. मात्र, ते आंदोलन होतं – जितेंद्र आव्हाड
-
सुहास देसाई यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या सिव्हिल सर्जनच्या अंगावर अख्खी बाटली खाली केली होती – जितेंद्र आव्हाड
-
शाईफेक हा आंदोलनाचा एक भाग आहे. मी ३५ वर्षे ते करतो आहे – जितेंद्र आव्हाड (सर्व फोटो संग्रहित)

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन