-
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अलीकडे निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पाचारण केलं होतं. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे गृहमंत्री ग्यानेंद्रही सहभागी होते.
-
सुमारे २५ मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर शाह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सर्वोच्च न्यायालयात सीमाभागातील गावांचा वाद सुरु आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांनी निकाल लागेपर्यंत गावांवर दावे टाळण्याचा सल्ला शहांनी दिला. पण, या बैठकीत काहीच साध्य झालं नसल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.
-
याच बैठकीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेल्या ट्वीटवरूनही समाचार घेतला आहे.
-
उद्धव ठाकरे म्हणाले, गेली १५ ते २० दिवस हा प्रश्न हा चिघळला जात आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं ट्वीटर हॅक झालं, तो शोध होईल. पण, खुलासा होण्यास एवढे दिवस का लागले.
-
बेळगावातील मराठी बांधवांवर पोलीस कारवाई आणि महाराष्ट्रातील वाहनांना प्रत्यक्ष बंदी झाली होती. मग जर ट्वीटर हॅक झालं होतं, तर मुख्यमंत्री कार्यालय सजग आणि जागृत असायला पाहिजे, की आपल्या ट्वीटरवरून कोण काय बोलतं.
-
जतच्या गावांनी कर्नाटकात येण्याचे संकेत दिले, असं बोम्मई यांचं ट्वीट अद्यापही आहे. यावर विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, हे ट्वीट जखमेवर फुंकर नाही मीठ चोळण्याचं प्रकार आहे. आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नुसतं होय ला होय करून आले आहे.
-
पुढं उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असताना बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला की, यापूर्वी दिला.
-
विधानसभेच अधिवेशन आधीपासून सुरु आहे की नंतर सुरु आहे.
-
सर्वोच्च न्यायालयाच निकाल लागेपर्यंत केवळ महाराष्ट्राने थांबायचं का? या सर्व गोष्टींचा उहापोह नुसता पोहे खाऊन निघणार असेल तर काही अर्थ नाही. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”