-
काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं.
-
सरकारवर अवलंबून का राहताय? या देशात शाळा सुरु कुणी केल्या, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरु केल्या. महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या.
-
या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू केली मला पैसे द्या, आता त्या काळी १० रुपये देणारे होते. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत ना?, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
-
या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका करण्यात येत होती. याप्रकरणावरून पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकही करण्यात आलेली.
-
यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
-
शरद पवार म्हणाले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चुकीचं बोललं की लोकं संतप्त होतात.
-
या लोकांनी भीक मागून शिक्षण संस्था चालवल्या म्हणतात. पण, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मुलांनी दोन वेळचं अन्न देण्याचा प्रश्न आला, तेव्हा स्वत:च्या पत्नीच्या गळ्यातील दागिने विकले. ही काय भीक नव्हती मागितली.
-
त्यामुळे अशा पद्धतीचा शब्दप्रयोग करणे आणि त्यांच्याबद्दल बोलण अत्यंत चुकीचं आहे.
-
दुर्दैवाने आताच्या राज्यकर्त्यांना तारतम्य राहिलं नाही आहे, असे शरद पवार यांनी म्हटलं.
-
महाविकास आघाडीच्या मोर्चाबाबत बोलताना शरद पवारांनी म्हटलं, या मोर्चासंबंधी लोकांत औत्सुक्य आणि राग आहे.
-
राग याच्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करण्यात आली.
-
जबाबदार लोकांनी केलेली ही विधान सामान्य माणसांना अस्वस्थ करणारी आहेत. त्याची प्रतिक्रिया उद्या मोर्चात दिसेल, हा मला विश्वास आहे, असे शरद पवारांनी सांगितलं.

Vaibhav Suryavanshi: १४ वर्षीय वैभवने रचला इतिहास! ३५ चेंडूत झळकावलं वादळी शतक