-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह अन्य भाजपा नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान करण्यात आला.
-
तसेच, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री बोम्मईंची विधान, राज्यातील प्रकल्पांची पळवापळव, महागाई आणि बेरोजगारी या विरोधात आज ( १७ डिसेंबर ) महाविकास आघाडीच्या वतीने ‘हल्ला बोल’ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
-
‘महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल’ या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे.
-
या मोर्चात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
-
सत्ताधाऱ्यांचा अहंकार आम्हाला मोडायचा आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
-
रोहिल पवार यांनी भाजापच्या ‘माफी मांगो’ आंदोलनावर टीका केली आहे. “भाजपाचा मोर्चा म्हणजे राजकारण,” असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
-
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. “महाराष्ट्रात स्वत:ला बाळासाहेबांच्या विचारांचे म्हणवून घेणारे मुख्यमंत्री भाजपाच्या टेकूवर सत्तेत बसले आहेत.”
-
“तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉ. आंबेडकरांचा, जोतिबा फुलेंचा अपमान होतोय. महाराष्ट्रातून उद्योग पळवले जात आहेत आणि हे गप्प बसले आहेत,” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
-
“महापुरुष तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत की नाहीत? त्यांचा अपमान होत असताना तुमची भूमिका काय? राज्यपालांना हे अजिबात हटवणार नाहीत. मराठी माणसाला आम्ही विचारतच नाहीत ही नेहमी यांची भूमिका असते,” असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं विधान, “शरद पवारांची गुगली भल्याभल्यांना कळत नाही, त्यांनी मला…”