-
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी शिवरायांबाबत केलेली वादग्रस्त विधानं, महागाई, बेरोजगारी आणि सीमाप्रश्नांसह विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजपा-शिंदे गटाविरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
-
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्वच नेते सहभागी झाले होते.
-
महाविकास आघाडीच्या मोर्च्यात तेजस ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेदेखील उपस्थित होत्या.
-
तेजस ठाकरेही मोर्च्यात सहभागी झाल्याने हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला.
-
यावेळी तेजस ठाकरे यांच्या उपस्थितीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
-
तेजस ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवादही साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.
-
तेजस ठाकरे यापूर्वीदेखील अनेकदा राजकीय व्यासपीठावर दिसून आले होते.
-
तेव्हाही तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा रंगल्या होत्या.
-
तेव्हाही तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा रंगल्या होत्या.

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?