-
राज्यपालांना मी राज्यपाल मानत नाही. त्या पदाचा नक्की मान राखतो. त्या पदावर कोणीही बसावं आणि कोणालाही टपल्या माराव्या हे आम्ही सहन करणार नाही. ( फोटो सौजन्य – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्स्प्रेस )
-
केंद्रात जो बसतो, त्याचा घरी काम करणारा एक सोय म्हणून पाठवून द्यायचे. पण, राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत असतात, असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ते मुंबईत महाविकास आघाडीच्या मोर्चात बोलत होते. ( फोटो सौजन्य – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्स्प्रेस )
-
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेशी केली होती. याचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे. ( फोटो सौजन्य – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्स्प्रेस )
-
उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईच्या पालकमंत्र्यांनी शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेची तुलना खोकेवाल्यांबरोबर केली. कुठे तुम्ही, कुठे शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास. ( फोटो सौजन्य – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्स्प्रेस )
-
आग्र्याहून सुटल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. यांनी खोके घेऊन लांडी लबाडी केली. ( फोटो सौजन्य – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्स्प्रेस )
-
तसेच, तोतयेगिरी करुन पाठीत वार केला. ते पण स्वत:च्या आईच्या कुशीत वार करून सरकार स्थापन केलं, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर केला आहे. ( फोटो सौजन्य – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्स्प्रेस )
-
मुंबईचा लचका तोडण्याचे काम सुरु आहे. वरळीत वरळीत जागतिक दर्जाचे मत्सालय करणार होतो. मात्र, ती जागा बिल्डरच्या घशात घालत आहेत. ( फोटो सौजन्य – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्स्प्रेस )
-
मुंबई आणि महाराष्ट्र आमची मात्रृभूमी आहे. परंतु, पालकमंत्री आहेत, ते मुंबईचा हिशोब स्क्वेअर फुटात करतात. ( संग्रहित छायाचित्र )
-
मुंबई म्हणजे स्क्वेअर फुटात विकणारी जागा नाही. ती आमची आईमाऊली आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ( फोटो सौजन्य – युवासेना इंन्स्टाग्राम अकाउंट )
-
कर्नाटक किंवा आणखीन काही असो हे सगळे एकत्र महाराष्ट्रावर तुटून पडत आहेत. एकीकडे अस्मिता पायदळी तुडवून टाकायची. ( फोटो सौजन्य – युवासेना इंन्स्टाग्राम अकाउंट )
-
आदर्श संपवून टाकायचे. महाराष्ट्राचे उद्योग दुसऱ्या राज्यात पळवून न्यायाचे, गावं कुरतडायला लागायची. ( फोटो सौजन्य – युवासेना इंन्स्टाग्राम अकाउंट )
-
म्हणजे चहुबाजून महाराष्ट्र कसा संपून जाईल, कसा भीकेला लागेल हा यांचा प्रयत्न आहे. आणि या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकारणात शेवट केल्याशिवाय स्वस्थ बसता येणार नाही. आजचा मोर्चा ही सुरुवात आहे, असा एल्गार उद्धव ठाकरेंनी केला आहे. ( फोटो सौजन्य – युवासेना इंन्स्टाग्राम अकाउंट )
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”