-
विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज वाघ (अहिरे) या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधानभवनात पोहोचल्या होत्या.
-
लोकप्रतिनिधी आणि मातृत्व या दोन्ही जबाबदार्या एकावेळी पार पाडणाऱ्या सरोज अहिरे यांचं मुख्यमंत्र्यांनी देखील कौतुक केलं.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरोज अहिरे यांना आपल्या दालनात बोलवून त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली.
-
“विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे, हे निश्चितच आव्हानात्मक आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
-
“लोकप्रतिनिधीत्व आणि मातृत्व या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान आहे”, असेही ते म्हणाले.
-
यावेळी आमदार संजय बनसोडे आणि आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ देखील उपस्थित होते.
-
“मी आई आहेच, तसेच आमदारही आहे. त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्त्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही.मात्र, याबरोबरच मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले”, अशी प्रतिक्रिया सरोज अहिरे यांनी दिली.
-
दरम्यान, प्रशंसक असे बाळाचे नाव असून ३० सप्टेंबर रोजी त्याचा जन्म झाला. अधिवेशन असल्याने सरोज अहिरे या बाळ व पती प्रवीण वाघ यांच्यासह विधानभवनात पोहोचल्या होत्या.
-
कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. लोकांचे अधिकाधिक प्रश्न सोडवण्यावर माझा भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”