-
काही दिवसांपूर्वी सीमाप्रश्नावरून दिल्लीत गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात बैठक झाली.
-
या बैठकीत बोम्मई यांनी सीमाप्रश्नावरून महाराष्ट्राच्या बाबतीत काही डिवचण्यासाठी ट्वीट केले होते, तो मुद्दा उपस्थित करण्यात आला. पण, हे ट्वीट बनावट असून अकाउंट हॅक झाल्याचा दावा बोम्मईंनी केला.
-
यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच, बोम्मईंची पाठराखण करणाऱ्या राज्य सरकारलाही खडसावलं आहे.
-
बोम्मई हा अतिशय खोटारडा माणूस आहे. मुख्यमंत्र्यांचे ट्वीट हॅक होतं आणि त्यांना १५ दिवसांनी समजतं. आम्हाला काय वेडे समजता का? अशी बिल फाडण्याचं काम कॉलेजमध्ये चालत होतं.
-
मला लाज वाटते बोम्मईचे कपडे सरकार संभाळत आहे. पण, बोम्मईमुळे तुमचे कपडे उतरत आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे सरकारवर केली आहे.
-
बोम्मईंच्या ट्वीटरनंतर मराठी माणसांनी कानाखाळी खाल्ल्या. आमच्या मराठी माणसांच्या गाड्या फुटल्या, त्यांचा अपमान झाला. तरीही मर्द मराठे आम्ही शांत बसलो. हा बोम्मी खोटारडा आहे. दिल्लीत येऊन सांगतो माझं ट्वीटच नाही.
-
मुख्यमंत्र्यांचं ट्वीटर हॅडल हॅक होणं हा आंतरारष्ट्रीय कट असू शकतो. तुम्हाला काय मस्करी वाटते का? विधानसभेत सांगायाचं ते कोणत्या पक्षाने ट्वीट केलं आहे.
-
बोम्मई चुकले तर पांघरून घालण्याचं काम करु नका. आमच्या मराठी माणसांनी मार खाल्ला आहे, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी शिंदे सरकारला खडसावलं आहे.
-
‘तुम्हारी गलती थी माफी मांगो खतम करो,’ असं बोम्मईंना सुनावायला पाहिजं होतं. पण, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
-
मुख्यमंत्र्यांच्या अकाउंटवरून दुसऱ्यांना ट्वीट करता येत नसता, सोप्प नाही ते. ट्वीटरचा मालक एलॉन मस्क आहे.
-
जागतिक दर्जावर ट्वीटरमध्ये एलॉन मस्क कोणाची दादागिरी चालू देत नाही.
-
हिंमत असेल तर बोम्मईंनी एलॉन मस्कला ट्वीट करून सांगावे माझं अकाउंट हॅक झालं आहे. १५ मिनींटात मस्क स्वत: ट्वीट करत म्हणेल काय झालं सांगा मला, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल