-
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे.
-
यात विरोधीपक्ष महाविकासआघाडीने सत्ताधारी भाजपाला अनेक मुद्द्यांवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यात विरोधी पक्षनेते अजित पवार आघाडीवर आहेत.
-
अजित पवारांनी पहिल्याच दिवशी सीमावादापासून नक्षलवाद्यांच्या धमकीच्या विषयापर्यंत शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
-
या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या वक्तव्यांचा हा आढावा…
-
सभागृहातील सर्व सदस्यांचे संरक्षण करणे, त्यांची सुरक्षेबाबत काही अडचण असेल तर त्यात लक्ष देऊन निर्देश देणं हा सभागृह अध्यक्षांचा अधिकार आहे – अजित पवार
-
नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला आव्हान दिलं आहे. गडचिरोलीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह प्रशासनाला थेट धमकी देण्यात आली आहे – अजित पवार
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांनाही नक्षलवाद्यांकडून अशाप्रकारे धमकीचे पत्र आले होते – अजित पवार
-
भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (माओवादी) पश्चिम झोन कमिटीचा सदस्य असलेल्या श्रीनिवास नावाच्या नक्षलवाद्याने थेट प्रेस नोट काढली आहे. त्यात आमदार आत्राम यांच्यासह प्रशासनाला धमकी दिली – अजित पवार
-
गडचिरोली तसा मागास आदिवासी जिल्हा आहे. तिथं सुरजागड येथे लोह-खनिज प्रकल्पावरून नक्षलवाद आणि प्रशासन असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे – अजित पवार
-
आता नक्षलवाद्यांकडून तेथील लोकप्रतिनिधींना धमक्या मिळत आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे – अजित पवार
-
सुरजागडला मागील पाच वर्षांपासून हा प्रकल्प सुरू आहे. त्याला स्थानिक प्रतिनिधींकडून नेहमीच विरोध होत आहे – अजित पवार
-
मधल्या काळात ८० वाहनांची जाळपोळ झाली आहे – अजित पवार
-
शरद पवार मुख्यमंत्री असताना तेव्हाही नक्षलवाद्यांनी बाबा आत्राम यांचं अपहरण केलं होतं – अजित पवार
-
नंतर चर्चा केल्यानंतर नक्षलवाद्यांनी आत्राम यांना सोडलं होतं – अजित पवार
-
बाबा आत्राम असो की कोणीही इतर लोकप्रतिनिधी असो, अशावेळी या घटनेचं गांभीर्य लक्षात घ्यावे – अजित पवार
-
तसेच सभागृहाच्या नेत्यांनी ताबडतोब आत्राम यांची सुरक्षा वाढवावी. त्यांना योग्य बंदोबस्त द्यावा – अजित पवार
-
केवळ आत्राम नाही, तर प्रशासनालाही सुरक्षा द्यावी. प्रशासनाला वाऱ्यावर सोडलं जातं असं वाटलं तर त्यांचाही विश्वास उडेल. तसंही होता कामा नये. राज्य सरकारने कठोरातील कठोर भूमिका घेतली पाहिजे – अजित पवार
-
सर्व छायाचित्र (संग्रहित छायाचित्र)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”