-
चीनमध्ये सोमवारी करोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी जाहीर केली. ४ डिसेंबरनंतर पहिल्यांदाच सरकारकडून करोना मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. : चीनसह जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत आहे. (सर्व फोटो – रॉयटर्सवरुन साभार)
-
चीनने शून्य करोना धोरण मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर करोना रुग्णसंख्या वाढणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र समोर आलेल्या आकडेवारीमध्ये संसर्गाचा वेग फारच जास्त असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चीनमध्ये लॉकडाउनसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाहूयात चीनमधील काही फोटो…
-
बीजिंगमध्ये फिव्हर क्लिनिकबाहेरील रुग्णांची गर्दी
-
बिजिंगमधील एका रुग्णालयाबाहेरचं हे दृष्य ज्यात रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी आणण्यात आल्याचं दिसत आहे.
-
रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी औषधांच्या दुकानाबाहेर लावलेली ही रांग. हा फोटो बीजिंगमधील आहे.
-
फिव्हर क्लिनिकबाहेरील ही लांबच लांब रांग आहे शांघायमधील. शांघाय हे देशाची आर्थिक राजधानीचं शहर आहे.
-
घराबाहेर पडताना मस्क हे अनिवार्य असल्याने शांघाय मेट्रोमधून मास्क घालून प्रवास करताना स्थानिक
-
शांघाय रेल्वे स्थानकामधील हा फोटो.
-
शांघाय आणि बिजिंगसारख्या शहरांमध्ये काहीजण पूर्ण पीपीई कीट घालून फिरताना दिसत आहेत.
-
शांघायमधील रुग्णालयामध्ये मास्क घालून प्रवेश करताना रुग्णांचे नातेवाईक
-
बिजिंगमधील स्पोर्ट्स अरेनाचं रुपांतर फिव्हर क्लिनिकमध्ये करण्यात आलं असून मोठ्या प्रमाणात बेड्सची सोय करण्यात आली आहे.
-
शांघाय मेट्रो स्थानकामध्ये ट्रेनची वाट पाहणारा प्रवासी.
-
बीजिंगमध्ये होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या लोकांच्या निवाऱ्याची सोय ज्या इमारतीमध्ये केली आहे तेथील आरोग्य व्यवस्था पाहणारे कर्मचारी आपल्या कामाची वेळ सुरु होण्याआधी तयारी करताना
-
रुग्णालयांबाहेर स्वत:च स्वत:च्या नाकामध्ये कॉटन स्टीक घालून स्वॅब द्यावा लागत आहे.
-
शांघायमधील स्वॅब कलेक्शन केंद्रातील कर्मचारी
-
शांघायमधील रस्त्यावरुन एका वयस्कर व्यक्तीला व्हीलचेअरवरुन नेणारी महिला.
-
शांघायमध्ये फिव्हर क्लिनिकला रुग्णाला हलवण्यात आलं तो क्षण
-
बिजिंगमधील स्पोर्ट्स अरेनामध्ये रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर बेड्सची सुविधा करण्यात आली आहे.
-
शांघायमधील एका इमारतीमधील लिफ्ट ऑप्रेटर अशाप्रकारे पूर्ण पीपीई कीट घालून बसलेला कर्मचारी
-
शांघाय: आपल्या बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्लास्टीकचं कव्हर असलेल्या गाडीमधून घेऊन जाणारी आई.
-
अनेक रुग्णालयांबाहेर स्वत:च स्वत:च्या नाकामध्ये कॉटन स्टीक घालून करोना चाचणीसाठी स्वॅब द्यावा लागतो.
-
रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसून काम करणारी तरुणीही मास्क घालून आहे. हा फोटो शांघाय शहरातील आहे.
-
बीजिंगमधील फिव्हर क्लिनिकबाहेरील हे दृष्य आहे. राजधानीच्या शहरामध्ये अशाप्रकारे अनेक क्लिनिक उभारण्यात आले आहेत.
-
शांघायमध्ये अॅण्टीजन चाचणीसाठी गर्दी करुन उभे असलेले स्थानिक
-
सरकारने मोठ्या संख्येने तापाची औषधं विकणारी तात्पुरती केंद्र सुरु केली आहेत. अशाच एका केंद्रावर औषध खरेदी करणारे स्थानिक
-
शांघायमधील अनेक भागांमध्ये करोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये अघोषित बंद पुकारल्यासारखी स्थिती आहे.
-
कामावर जाण्याआधी प्रत्येक कारखाना, कंपनीमधील कर्मचाऱ्यांची करोना चाचणी होते. शांघायमधील अशाच एका कंपनीबाहेर रांगेत उभे असलेले कर्मचारी.
-
मास्क लावून खिडकीमधून बाहेर पाहणाऱ्या या व्यक्तीचा फोटो लुजीयानझुई प्रांतातील आहे.
-
स्मशानभूमीबाहेरील कार पार्कींगमधील कर्मचारी गाड्यांसाठी रस्ता मोकळा करुन देताना हा फोटो आहे बीजिंगमधला.
-
बीजिंगमध्ये होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या रुग्णांच्या इमारतीबाहेर आपली शिफ्ट सुरु होण्याची वाट पाहणारे आरोग्य कर्मचारी
-
सामान्यपणे गजबजाट असलेले असे अनेक चौक सध्या शांघायमध्ये ओस पडल्याचं चित्र दिसत आहे.
-
करोना चाचणीसाठी शांघायमधील अनेक केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे,
-
सरकारने १० तारखेला करोनासंदर्भातील नियम शिथिल केल्यानंतर करोनाचं उगमस्थान मानल्या जाणाऱ्या वुहानमधील रेल्वे स्थानकाबाहेर अशाप्रकारे लोकांनी प्र्वासासाठी गर्दी केली होती.
-
बिजिंगमधील स्पोर्ट्स अरेनामध्ये करोना चाचण्यांसाठी नागरिकांनी लावलेली रांग
-
रेस्तराँमध्ये काम करणारे कर्मचारी आपली शिफ्ट सुरु होण्याआधी करोना चाचणी केंद्राबाहेर रांगेत उभे असतानाच हा फोटो शांघायमधील आहे.
-
होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या लोकांची व्यवस्था असलेल्या इमारतीखाली बसलेले आरोग्य कर्मचारी. हा फोटो बिजिंगमधील आहे.
-
शांघाय: अगदी रिक्षाचालकही पीपीई कीट घालून काम करतानाचं हे करोना संसर्गाची दाहकता दाखवणारं बोलकं चित्र
-
बीजिंगमधील स्मशानभूमीतील हे दृष्य ज्यात मृतदेह गाडीमधून बाहेर काढला जात आहे.
-
बिजिंगमधील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी एका मृतदेह नेला जात असताना अंत्यदर्शन घेणारे नातेवाईक.

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित