-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल सर्वांना चांगलेच परिचीत आहेत. वेळोवेळी त्यांनी आपल्या स्पष्टवक्तेपणाचा प्रत्ययही दिलेला आहे.( सर्व फोटो-संग्रहित)
-
विरोधकांवर टीका असेल किंवा मग पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची कानउघडणी, राज ठाकरे त्यांच्या शैलीत रोखठोकपणे सुनावतात, हेही सर्वांना माहीत आहे.
-
आताही राज ठाकरे यांनी मनसैनिकांना कडक शब्दांमध्ये सुनावल्याचं समोर आलं आहे.
-
सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या आणि नंतर काय घाण करायची ती करा अशा शब्दांत राज ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं आहे.
-
राज ठाकरेंनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून सोशल मीडियावर शेअर केलं आहे. ही अंतिम ताकीद आहे असा इशाही त्यांनी दिला आहे.
-
राज ठाकरे म्हणाले, “सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाटेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे.”
-
“माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स यामुळे हे सगळे शेफारले आहेत.”
-
“इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही.”
-
पुढे ते म्हणाले की “माझ्या पक्षातल्या कोणालाही पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्याशी बोला, माझ्याशी बोला.”
-
“पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या. मग त्यानंतर काय घाण करायची असेल ती करा”.
-
“पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
-
ही समज नाही, तर अंतिम ताकीद आहे याची नोंद घ्या असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल