-
गुन्हेगारी विश्वात ‘बिकिनी किलर’ या नावाने कुख्यात असलेला फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे निर्देश नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
-
दोन अमेरिकी पर्यटकांच्या हत्येच्या आरोपाखाली चार्ल्सला २००३ मध्ये नेपाळमध्ये अटक करण्यात आली होती.
-
शोभराजवर भारतासह थायलंड आणि तुर्कीमधील २० पेक्षा जास्त महिलांची हत्या केल्याचा आरोप आहे. १९ वर्षांपासून नेपाळच्या तुरुंगात बंद असलेला चार्ल्स शोभराज नेमका आहे कोण? जाणून घेऊया.
-
‘द सर्पंट’ व ‘बिकिनी किलर’ या सारख्या नावाने कुख्यात असलेल्या चार्ल्स शोभराजचे वडील भारतीय आणि आई व्हिएतनामी होती. त्याचा जन्म व्हिएतनाममध्ये झाला तेव्हा त्या देशावर फ्रान्सने कब्जा केला होता. त्यामुळेच चार्ल्स शोभराजकडे फ्रान्सचं नागरिकत्व आहे.
-
शोभराजला १९७६ मध्ये भारतातही अटक करण्यात आली होती. तसेच त्याला सर्वोच्च न्यायालयाने १२ वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, तो १९८६ मध्ये तिहार तुरुगांतून पळाला.
-
१९७२ ते १९८२ त्याच्यावर विविध देशात २० पेक्षा पर्यटकांची हत्या केल्याचा आरोप आहे. चार्ल्स भारतात फिरायला आलेल्या परदेशी महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून नशेची औषधं द्यायचा.
-
१९७० च्या दशकात चार्ल्सने ज्या महिलांची हत्या केली. त्यांच्या मृतदेहावर फक्त बिकिनी होती. त्यामुळेच बिकिनी किलर म्हटलं जात होतं.
-
१९७० च्या दशकात चार्ल्स शोभराजने अनेक हत्या केल्या. त्यात जेव्हा महिलांचे मृतदेह मिळाले त्या मृतदेहावर फक्त बिकिनी होती. त्यामुळेच चार्ल्स शोभराजला बिकिनी किलर असंही संबोधलं जातं.
-
चार्ल्सचे आयुष्यच मोठं रंजक ठरलं आहे. तसेच त्यांच्यावर The Sprpent नावाची वेब सीरिजही तयार करण्यात आली आहे.
गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’