-
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती शैलेश, मुलगा कुणाल आणि मुलगी चैताली असा परिवार आहे. (Twitter)
-
मुक्ता टिळक गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. (Twitter)
-
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. महापालिकेच्या इतिहासात भाजपाची प्रथमच सत्ता आल्यानंतर भाजपाच्या पहिल्या महापौर होण्याचा मान मुक्ता टिळक यांना मिळाला होता. (Twitter)
-
अडीच वर्षे त्या महापौर होत्या. नगरसेवक असतानाच त्यांनी २०१९ मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या होत्या. (Twitter)
-
मुक्ता टिळक यांचा राजकीय प्रवास नगरसेविका म्हणून सुरू झाला होता. त्या चारवेळा नगरसेविका होत्या. भाजपातही त्यांनी विविध पदे भूषविली. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोग या असाध्य आजाराने ग्रस्त होत्या. (Twitter)
-
दुर्धर आजाराने ग्रस्त असतानाही त्यांनी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत रुग्णवाहिकेतून मुंबईत जाऊन मदत केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्या या पक्षनिष्ठेचे कौतुक केले होते. (Twitter)
-
मुक्ता टिळक यांच्या निधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शोक व्यक्त केला. त्यांचे अंतदर्शन घेण्यासाठी आज फडणवीस यांच्यासह, चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे इतर अनेक नेते पुण्यात दाखल झाले.
-
यावेळी मुक्ता टिळक यांची आठवण सांगताना फडणवीस भारावले होते. यावेळी ते म्हणाले की, “राज्यसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आयसीयूमध्ये असतानाही पक्षाची गरज लक्षात घेऊन त्यांनी मतदान केले होते.” (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)
-
फडणवीस म्हणाले, “भारतीय जनता पार्टीच्या ध्येयनिष्ठ कार्यकर्त्या, विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ॐ शांती.” (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)
-
“या कठीण प्रसंगात आम्ही सारेच त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.” (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)
-
“मुक्ताताई पुण्याच्या माजी महापौर सुद्धा होत्या. त्यांनी अनेक विकास कामात मोठे योगदान दिले. पक्षाबद्दल त्यांची प्रतिबद्धता ही अवर्णनीय अशीच होती.” (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील आणि इतर अनेक भाजपा नेत्यांनी मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. आज वैकुंठ स्मशामभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

Aaditya Thackeray : “दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कोण चालवतंय? मुख्यमंत्र्यांना…”, आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण