-
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमागे एका राष्ट्रवादी महिला नेत्याचा समावेश असल्याचा आरोप केला.
-
तसेच तक्रारदार महिलेला फुस लावली जात आहे, असाही दावा शेवाळेंनी केला. त्यांच्या या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.
-
त्या रविवारी (२५ डिसेंबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या. त्या नेमक्या काय म्हणाल्या याचा हा आढावा…
-
पीडित मुलगी दुबईत राहत होती. तेथे राहुल शेवाळेंनी स्वतःचा पॉवर-पैसा वापरला – रुपाली ठोंबरे पाटील
-
ती मुलगी माझ्याशी लग्न कर म्हणत होती आणि त्यावरून वाद झाला. यानंतर तिने राहुल शेवाळेंचा तो व्हिडीओ जारी केला – रुपाली ठोंबरे पाटील
-
व्हिडीओ जारी केल्यामुळे शेवाळेंनी त्या मुलीला एका प्रकरणात अडकवलं. तो खटला चालला आणि या प्रकरणी ती मुलगी ७८ दिवस तुरुंगात होती. त्यानंतर ती तुरुंगाबाहेर आली – रुपाली ठोंबरे पाटील
-
दुबईचे काही कायदे आहेत. त्यानुसार दुबईत येऊन असे प्रकार केल्याने त्यांनी तिला दुबईत येण्यास नकार दिला. त्यात विशेष काही नाही. तो कायदा आहे – रुपाली ठोंबरे पाटील
-
राहुल शेवाळेंचे दुबईत असणाऱ्या महिलेशी संबंध कसे आले? ते स्वतःला सांसारिक समजता, त्यांचं लग्न झालं आहे, मुलंबाळं आहेत. त्यांचा पाय कसा घसरला? – रुपाली ठोंबरे पाटील
-
ते त्यांच्या विवाहबाह्य संबंधाचा खुशाल दाऊदशी संबंध लावतात. लाज वाटते. लोक म्हणत असतील हे खासदार आहेत की कोण आहेत – रुपाली ठोंबरे पाटील
-
याची चौकशी झालीच पाहिजे. मी देवेंद्र फडणवीसांना विनंती करते की, राहुल शेवाळेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे – रुपाली ठोंबरे पाटील
-
ती मुलगी गुन्हेगार नाही. ते सिद्ध झालेलं नाही. ती आरोपी आहे. शेवाळे खासदार आहेत, संसदेत प्रतिनिधित्व करतात, तर त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे – रुपाली ठोंबरे पाटील
-
शेवाळेंशी विवाहबाह्य संबंध असलेली महिला लग्न करण्यासाठी मागे लागते. त्यानंतर त्यांनी तिला आपल्या पॉवरचा उपयोग करून एका रॅकेटमध्ये अडकवलं गेलं – रुपाली ठोंबरे पाटील
-
आता पीडित महिलेचा दाऊदशी संबंध असल्याचं सांगत आहेत. हे अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीर आहे – रुपाली ठोंबरे पाटील
-
राहुल शेवाळेंचं म्हणणं आहे की, त्या तरुणीचा दाऊदशी संबंध आहे, तर मग १९९३ च्या बॉम्बस्फोटात या मुलीचा हात नसेल ना? असू शकतो कारण खासदार सांगतात – रुपाली ठोंबरे पाटील
-
त्या मुलीचा जन्म १९८९ चा आहे. म्हणजे ती मुलगी ३-४ वर्षांची असताना तिचा दाऊदबरोबर बॉम्बस्फोटात सहभाग असू शकतो. कारण खासदार सांगत आहेत – रुपाली ठोंबरे पाटील
-
अरे लाजा वाटल्या पाहिजे. ते लोकप्रतिनिधी आहेत आणि विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी दाऊदशी संबंध असल्याचं म्हणतात – रुपाली ठोंबरे पाटील
-
त्या मुलीचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करतात, पण त्या मुलीशी राहुल शेवाळेंचे विवाहबाह्य संबंध होते – रुपाली ठोंबरे पाटील
-
मग त्यांनी देशाची गोपनीय माहिती त्या मुलीला दिली का? त्यांना लाज वाटली पाहिजे – रुपाली ठोंबरे पाटील
-
माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यात तिने पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी तिला काय रिपोर्ट दिला याचे पुरावे आहेत – रुपाली ठोंबरे पाटील
-
शेवाळेंनी तिच्यावर कलम १५६ प्रमाणे केस दाखल केली. त्याचेही सर्व जबाब आणि कागदपत्रे आहेत – रुपाली ठोंबरे पाटील
-
हे प्रकरण म्हणजे राहुल शेवाळेंचे विवाहबाह्य संबंध, त्या महिलेचं केलेलं शोषण, तिला जीवे मारण्याची धमकी देणे असं आहे – रुपाली ठोंबरे पाटील
-
आता ते भाजपाबरोबर आहेत, म्हणून एनआयए आणि दाऊद असा उल्लेख करत असतील, तर त्यांची पात्रता आणि बुद्धी कळली – रुपाली ठोंबरे पाटील
-
राहुल शेवाळेंनी त्या महिलेसोबत दुबईत मजा केली आणि आता ते विवाहबाह्य संबंधावरून लक्ष हटवण्यासाठी दाऊदशी संबंधाचा आरोप करत आहेत, असंही रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं.
-
हेही वाचा – “खासदार राहुल शेवाळेंनी वैयक्तिक आयुष्यात शेण खाल्लं आणि आता…”, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल (सर्व छायाचित्र – संग्रहित)

Pahalgam Terror Attack: “हे दहशतवादी फार काळजीपूर्वक…”, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या पाठलागाचा थरार; ५ दिवसांत ४ वेळा ठावठिकाणा लागला पण…