-
विधिमंडळ अधिवेशनाचं आजचं कामकाज सुरू होण्याअगोदर भाजपाच्या आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील रेशीमबाग कार्यालयास भेट दिली.(फोटो– फडणवीस ट्विटर)
-
यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
-
फडणवीस म्हणाले, “मागील २५ वर्षे सातत्याने जेव्हा जेव्हा नागपुरात अधिवेशन होतं, आम्ही भाजपाचे सर्व आमदार हे या ठिाकणी स्मृतिस्थळावर येतो.
-
“डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरूजी यांच्या समाधींचं दर्शन घेतो आणि एक परिचयात्मक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी होतो.”
-
“यंदाही दोन वर्षांच्या खंडानंतर आम्ही या ठिकाणी आलो, कारण दोन वर्ष या ठिकाणी अधिवेशनच झालं नाही.”
-
“सगळ्यांमध्ये या ठिकाणी येण्याची एक उत्कंठा होती.”
-
“आमच्या सगळ्यांसाठी ही प्रेरणाभूमी आहे.”
-
“ज्या राष्ट्रीयतेच्या विचारातून आम्ही देशात किंवा विविध क्षेत्रात काम करतो, त्या विचाराचा जन्म ज्या ठिकाणी झाला आणि त्याचे जे ऊर्जा पुरुष आहेत त्यांच्याकडून उर्जा मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो.”
-
याप्रसंगी सर्व भाजपा आमदारांना ‘भविष्यातला भारत’ हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”