-
कोविड प्रकरणांच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची सज्जता तपासण्यासाठी मंगळवारी पुण्यातील औंध येथील जिल्हा रुग्णालयात आधुनिक सुविधांसह ऑक्सिजन प्लांट आणि नव्याने बांधलेल्या ५० बेडच्या कोविड-आयसीयूची तपासणी केली केली गेली. ( फोटो – अरुल होरायझन)
-
पुणे शहरातही अद्याप करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या संपूर्ण नियंत्रणात आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.
-
मात्र, हे चित्र बदललेच तर नायडू रुग्णालयासह महापालिकेची सर्व रुग्णालये परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहेत, असा निर्वाळा पुणे महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
-
करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
-
या पार्श्वभमीवर देशातील सर्व रुग्णालये, करोना समर्पित रुग्णालये, आरोग्य सुविधा यांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी २७ डिसेंबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले होते.
-
चीन, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि फ्रान्स आदी देशांमध्ये करोनो रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने केंद्र सरकारकडून देशातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला जात आहे.
-
ओमायक्रोनचा नवा विषाण जगभरात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे करोनाचा सामना करण्यासाठी देशातील सर्व रुग्णालयांमधील आरोग्य सुविधा सज्ज आहे का याची खातरजमा करण्यासाठी ही आढावा मोहीम सुरू आहे.
-
या मोहिमेदरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आरोग्य सुविधांचा विचार करण्यात येणार आहे.
-
यामध्ये रुग्णालयांमधील खाटांची क्षमता, विलगीकरणासाठी उपलब्ध खाटा, प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटा, अतिदक्षता विभागातील खाटा आदींची उपलब्धता तपासली जाणार आहे.
-
तसेच, जीवन रक्षक प्रणाली असलेल्या खाटा, डॉक्टर, परिचारिका, निम्न वैद्यकिय, आयुष डॉक्टर, आशा, अंगणवाडी सेविका यांची उपलब्धता पाहीली जाणार आहे.
-
याशिवाय, करोना व्यवस्थापनावर व्यावसायिक प्रशिक्षित आरोग्य सेवा, शस्त्रक्रियेसाठी प्रशिक्षित आरोग्य सेवा कर्मचारी, जीवन रक्षक प्रणाली वापरण्यासाठी प्रशिक्षित असलेले कर्मचारी यासह इतर कर्मचाऱ्यांचीही उपलब्धता तपासण्यात येणार आहे.
-
प्रगत आणि मूलभूत जीवन समर्थन रुग्णवाहिकांची उपलब्धता, इतर रुग्णवाहिकांची उपलब्धता, रुग्णवाहिका कॉल सेंटरची उपलब्धता, करोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणि क्षमता पाहिली जाणार आहे.
-
ही विशेष मोहीम आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.
-
या मोहिमेनुसार आरोग्य सुविधांच्या तयारीच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘कोविड इंडिया पोर्टल’वर ऑनलाइन अर्ज देण्यात आला आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार