-
शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारें श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
-
यानंतर आता सुषमा अंधारेंनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. त्या मंगळवारी (२७ डिसेंबर) सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होत्या. त्याचा हा आढावा…
-
कुठे शिळ्या कढीला उत आणत आहात – सुषमा अंधारे
-
देवेंद्र फडणवीस इतके अभ्यासू आहात, नाही नाही ते सर्व मुद्दे काढले होते. १३ वर्षे तुम्ही झोपला होतात का? आत्ता तुम्हाला हे सर्व सुचतंय का? – सुषमा अंधारे
-
तुम्हाला असं वाटतंय की, तुमच्या या जाळ्यात मी अडकेल, पण अजिबात नाही – सुषमा अंधारे
-
यानंतरही मी चुकतेय असं वाटत असेल, तर मी पुन्हा एकदा सांगते की, भागवत संप्रदायाचा कुठलाही सच्चा वारकरी अजिबात अभद्र आणि अमंगल भाषा बोलत नाही – सुषमा अंधारे
-
हे आहे ते मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी आहेत – सुषमा अंधारे
-
या धारकऱ्यांनी सुपारी घेऊन काम करणं सुरू केलं असेल, तर मला बाकीच्या भक्तुल्ल्यांविषयी अजिबात बोलायचं नाही – सुषमा अंधारे
-
मात्र, फडणवीसांना माझी विनंती आहे की, मी तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे – सुषमा अंधारे
-
देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंबरोबरही चर्चेला बसले नाहीत. कारण फडणवीस खोटारडे आहात. म्हणूनच ते चर्चेला बसत नाहीत – सुषमा अंधारे
-
या सर्व विषयांवर मी फडणवीसांबरोबर चर्चेला बसायला तयार आहे – सुषमा अंधारे
-
फडणवीसांना वेळ नसेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही अभ्यासू मंत्र्याला चर्चेला बसवावं. माझी चर्चा करण्याची तयारी आहे – सुषमा अंधारे
-
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते याचा आढावा खालीलप्रमाणे…
-
तुमच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणतात की, राम आणि श्रीकृष्णा थोतांड आहे – देवेंद्र फडणवीस
-
सात महिने अगोदर सीता मातेला जो सोडून जातो आणि स्वत: शबरीसोबत बोरं खात बसतो. तुमच्या नेत्या देवांचा असा अवमान करतात – देवेंद्र फडणवीस
-
कृष्ण बायकांना अंघोळ करताना पाहतो. कृष्णा पुन्हा अवतरत का नाही? तो कुठल्यातरी गोपिकेसोबत डेटवर गेला असावा. तुमच्या नेत्या आमच्या कृष्णाबद्दल असं बोलतात – देवेंद्र फडणवीस
-
यावर तुम्ही काहीही बोलत नाही, मूग गिळून गप्प बसले आहात – देवेंद्र फडणवीस
-
फडणवीसांनी विधान परिषदेत केलेल्या या टीकेनंतर गदारोळ होऊन परिषदेतील कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…