-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस पुणे दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांना पुणेकरांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. (फोटो-मनसे ट्विटर)
-
पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखांचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते झाले.
-
पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येत गर्दी करत राज ठाकरेंचे स्वागत केले.
-
काही ठिकाणी राज ठाकरेंचे औक्षणही करण्यात आले.
-
राज ठाकरेंनी सहजीवन व्याख्यानमालेत ‘नवं काही तरी’ या विषयावर संवाद साधला, या कार्यक्रमासही मोठी गर्दी होती.
-
यावेळी राज ठाकरे म्हणाले, “राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नाहीत… राजकारणातही अनेक अंग आहेत तुम्ही विविधांगाने योगदान देऊ शकता.”
-
“राजकारणात फक्त वारसा लागतो हे खोटं आहे… वारसाने तुम्ही एखाद्याला राजकारणात आणू शकता पण लादू शकत नाही.”
-
“महाराष्ट्रात अनेक मुलं-मुली शेती क्षेत्रात क्रांतिकारी प्रयोग करत आहेत मी त्यांना भेटायला जाणारच आहे पण त्यांना राजकारणातही आणणार.”
-
“मी महाराष्ट्राला आवाहन करू इच्छितो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, कोणत्याही वयोगटाचे असा… राजकारणात या मी संधी द्यायला तयार आहे.”

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स