-
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून हिवाळी अधिवेशनात जोरदार टोलेबाजी केली.
-
मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर उरलेले आमदार निघून जातील यामुळे घाबरून जाऊ नका, असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
-
यावर एकनाथ शिंदेंनीही अजित पवारांना आपण एकत्र मिळून हे मंत्री ठरवू असा टोला लगावला.
-
अजित पवार गुरुवारी (२९ डिसेंबर) नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
देवेंद्र फडणवीस अडचणीच्या विषयांवर बोलले नाही – अजित पवार
-
कुठं कसं काय बोलावं आणि कुठलं बोलू नये, कशाला बरोबर दुर्लक्षित करावं हे फडणवीसांना चांगलं जमतं – अजित पवार
-
मी मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याचा विषय काढला. त्या विषयाला तर फडणवीसांनी स्पर्शच केला नाही – अजित पवार
-
त्यावेळी त्यांनी सुनेत्राताईंचं नाव घेतलं, पण ते वेगळ्या अर्थाने नाव घेतलं. मात्र, मला तसलं काही सांगू नका – अजित पवार
-
तिथं आमच्या मंदाताई, मनिषाताई अशा मान्यवर महिला लक्ष ठेऊन आहेत – अजित पवार
-
मी गंमतीने म्हणतो असं नाही. ज्यावेळी आपण राज्याला पुढे घेऊन जात असतो तेव्हा महिलांनाही प्रतिनिधित्व द्या – अजित पवार
-
मंत्रिमंडळातील बाकीच्या रिक्त जागाही भरा. कोणाला घ्यायचं त्यांना घ्या – अजित पवार
-
मी तुम्हाला सांगतो, तुम्ही घाबरू नका – अजित पवार
-
मंत्रिमंडळातील ४३ जागा भरल्यावर उरलेले आमदार निघून जातील का याची तुम्ही अजिबात काळजी करू नका – अजित पवार
-
आपण दोघे धरून २० च मंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आणखी २३ मंत्री करण्याचा अधिकार आहे – अजित पवार
-
यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, आपण मिळून २३ मंत्री ठरवू. त्यानंतर अजित पवारांनी हसत प्रतिक्रिया दिली.
-
मला मंत्रिमंडळ विस्ताराच्या निर्णयात सहभागी करून घेऊ नका – अजित पवार
-
उगीच सुई दुसरीकडे कुठेतरी सोडतात आणि मग वेगळी चर्चा होते – अजित पवार
-
तुमचं तुम्हीच ठरवा. ते भरत गोगावले सारखे माझ्याकडे बघून मिशा पिळतात, दाढीवरून हात फिरवतात. काय न सांगितलेलं बरं – अजित पवार
-
आज सत्ताधारी पक्षातले दोन आणि विरोधकांचा एक असे तीन प्रस्ताव होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा दोघांनी मिळून त्याचं उत्तर दिलं – अजित पवार
-
मी बघत होतो. उपमुख्यमंत्री प्रत्येकवेळी आक्रमकपणे मुद्दा मांडतात. टाळ्या घेतात. सगळे बाकडी वाजवत असतात – अजित पवार
-
देवेंद्रजी माझा तुमच्यावर एक आक्षेप आहे. मी बघितलंय – अजित पवार
-
जेव्हा एकनाथ शिंदे बोलत होते, तेव्हा एकही भाजपावाला टाळी वाजवत नव्हता – अजित पवार
-
तुम्ही टीव्हीवर बघा. तानाजीराव गेले, तेव्हा तर त्यांनी आमच्याच लोकांना सांगितलं की टाळ्या वाजवा – अजित पवार
-
देवेंद्रजी, तुम्ही पाच वर्षं मुख्यमंत्री होतात.एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी, करोडोंचे प्रस्ताव आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सगळ्यांनी मिळून किती टाळ्या वाजवल्या हो? – अजित पवार
-
तुमचा तर चेहरा मी सारखा बारकाईनं बघत होतो. तुम्ही इतके अस्वस्थ होत होता – अजित पवार
-
माझं तुमच्याकडेच लक्ष होतं. कारण सगळ्यात जवळ इथून तुम्हीच आहात. बाकीचे सगळे लांब आहेत – अजित पवार
-
दरम्यान, यावर मुख्यमंत्र्यांनी “आम्हालाही चान्स मिळणार आहे”, असं म्हणताच “तुम्हाला तर सगळा चान्स आहेच. तुम्ही विधिमंडळाचे नेतेच आहात”, असं अजित पवारांनी सांगितलं.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”