-
शेतकऱ्यांसाठी पाण्याच्या टाकीवरून चढणे असो किंवा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या दालनात साप सोडणे असो, आमदार बच्चू कडू हे नेहमीच आपल्या अनोख्या आंदोलनांमुळे चर्चेत असतात.
-
दरम्यान, पुन्हा एकदा त्यांचे अशाच प्रकारे अनोखं आंदोलन सुरू आहे. विशेष म्हणजे त्यांचे हे शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आहे.
-
बच्चू कडू दोन दिवसांपासून आमदार निवासात न राहता, शेतातील पालीमध्ये राहत आहेत.
-
बच्चू कडू यांच्या बरोबर साधारण एक हजार कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.
-
याच पालीतून ते अधिवेशनाला हजेरी लावत आहेत.
-
आंदोलन करणं म्हणजे विरोध करणं, असं होत नाही. आंदोलन करणं म्हणजे लक्ष वेधणं होय. एखाद्या आईचं लेकरू ओरडलं तर याचा अर्थ ते आईच्या विरोधात आहे, असं होत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
-
आज आपल्या स्वातंत्र्य मिळून ७० वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र, आजही देशातील जनता अन्न, वस्त्र व निवाऱ्यापासून वंचित आहे. आमदार, खासदार, बिल्डर यांचे एक नाही तर दहा-दहा घरं व्हायला लागली आहेत. मात्र, काही लोकं अजूनही मातीच्या घरात राहात आहेत, त्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले जावं, यासाठी हे आंदोलन आहे, असं ते म्हणाले.
-
अनेक शेतकरी वर्षानुवर्षांपासून पालीत राहत आहेत. त्यांना पाणी कुठून मिळणार? आयुष्य कसं जाणार? शहरात मोठ्या लोकांच्या पोरांना स्टटी रुम मिळते. मात्र, गरीब शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण सुद्धा मिळत नाही. जेवढ्या शहरातल्या लोकांच्या बाथरूमा असतात, तेवढं शेतकऱ्याचे घरदेखील नसते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
-
केंद्र सरकारनं २०२२ मध्ये सर्वांना घर देणार, अशी घोषणा केली होती. शहरात पंतप्रधान आवास योजनेचे अडीच लाख रुपये दिले जातात. मात्र, त्याच योजनेचे गावात एक लाख १८ हजार रुपये दिले जातात. शहरात आणि खेड्यात एवढी तफावत का आहे? गावात घरकुलासाठी २१ अटी कशासाठी? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”