-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.
-
आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी सकाळीच गांधीनगरमध्ये दाखल झाले.
-
पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर मोठी गर्दी जमली होती.
-
हिराबेन मोदी यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी यावर शोक व्यक्त केला.
-
मोदी कुटंबीयांना धीर देण्यासाठी विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या घरी सकाळीच पोहचले होते.
-
पंतप्रधान मोदींनी घरीच आईच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
-
पार्थिवाला यू. एन. मेहता रुग्णालयातून मोदींच्या गांधीनगरमधील घरी आणण्यात आलं होतं.
-
“एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विलीन झालं,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आईच्या मृत्यूबद्दलची माहिती दिली आहे.
-
आईचा दिवा हातात घेतलेला फोटो शेअर करत, “आईमध्ये मी कायमच त्या त्रिमूर्तीचा अनूभव घेतला ज्यात एक तपस्व्याची यात्रा, निष्काम कर्मयोग्याचं प्रतीक आणि मूल्य दिसून आली,” असं मोदी म्हणाले आहेत.
-
रुग्णवाहिकेपर्यंत पार्थिव नेताना मोदींनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला.
-
हिराबेन यांच्या अंत्ययात्रेतही मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
-
अंत्ययात्रेप्रसंगी सुरक्षा व्यवस्थाही होती. मोदींच्या सभोवताली अन्य गर्दी होऊ नये याची दक्षताही घेण्यात आल्याचे दिसले.
-
रुग्णवाहिकेमधून पार्थिव स्मशानभूमीमध्ये अंतिमसंस्कारासाठी नेताना मोदींनी रुग्णवाहिकेमधूनच प्रवास केला.
-
मोदींच्या मातोश्रींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी जमली होती.
-
माध्यमप्रतिनिधींचीही मोठ्याप्रमाणावर गर्दी होती.
-
जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने २८ डिसेंबर रोजी यूएन मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं.
-
रात्री साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी अहमदाबाद गेले होते.
-
यू. एन. मेहता रुग्णालयाने हिराबेन मोदी यांच्या मृत्यूची माहिती एका पत्रकाद्वारे जारी केली आहे.
-
३० डिसेंबर २०२२ रोजी यू. एन. मेहता रुग्णालयामध्ये हिराबेन मोदी यांचं उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरच्या श्वास घेतला, असं रुग्णालयाने म्हटलं आहे.
-
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती.
-
हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. याच वर्षी त्यांनी वयाची शंभरी ओलांडली होती.
-
…आणि पंतप्रधान मोदींनी आपल्या आईला अखेरचा निरोप दिला.
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO