-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. आपल्या आईचा फोटो शेअर करत मोदींनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली.
-
पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी अहमदाबाद गेले होते. आज रात्री साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी अहमदाबाद गेले होते. आज रात्री साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
“एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विलीन झालं,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आईच्या मृत्यूबद्दलची माहिती दिली आहे.
-
हिराबेन यांचा हातामध्ये दिवा घेऊन असलेला फोटो शेअर करत, “आईमध्ये मी कायमच त्या त्रिमूर्तिचा अनूभव घेतला ज्यात एक तपस्व्याची यात्रा, निष्काम कर्मयोग्याचं प्रतीक आणि मूल्य दिसून आली,” असं मोदी म्हणाले आहेत.
-
आईच्या निधानांनातर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, आईने त्यांना दिलेल्या शिकवणीचे स्मरण केले. याबाबतही त्यांनी लिहिलं आहे.
-
मोदी म्हणतात की त्यांच्या आईने त्यांना जाणीव करून दिली की औपचारिक शिक्षण घेतले नसले तरीही आयुष्यात खूप काही शिकता येते. याबद्दलची एक घटना त्यांनी शेअर केली.
-
एका कार्यक्रमात मोदींना आपल्या सर्व शिक्षकांचा सार्वजनिकरित्या सन्मान करायचा होता. या शिक्षकांमध्ये त्यांच्या आईचे स्थान सर्वोच्च होते. मात्र यासाठी त्यांच्या आईने नकार दिला.
-
त्या मोदींना म्हणाल्या, “मी एक सामान्य माणूस आहे. मी कदाचित तुला जन्म दिला असेल, परंतु तुला तुझ्या शिक्षकांनी शिकवले आहे आणि वाढवले आहे.”
-
मोदी पुढे म्हणाले की, त्यांच्या आई स्वतः जरी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या नाहीत, तरीही नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदा अक्षरे शिकवणारे जेठाभाई जोशी यांच्या कुटुंबातील कोणीतरी या कार्यक्रमाला हजर राहील अशी तजवीज त्यांनी केली.
-
त्यांची धडपड पाहिल्यानंतर मोदी म्हणाले होते, “आईची विचार प्रक्रिया आणि दूरदर्शी विचारसरणीने मला नेहमीच आश्चर्यचकित केले आहे.”
-
दरम्यान, आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरमध्ये दाखल झाले. पार्थिवाला यू. एन. मेहता रुग्णालयातून मोदींच्या गांधीनगरमधील घरी आणण्यात आलं होतं.
-
मोदींनी घरीच आईच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर रुग्णवाहिकेमधून पार्थिव स्मशानभूमीमध्ये अंतिमसंस्कारासाठी नेताना मोदींनी रुग्णवाहिकेमधूनच प्रवास केला.
-
रुग्णवाहिकेपर्यंत पार्थिव नेताना मोदींनीच पार्थिवाला खांदा दिला. पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी रुग्णालयाबाहेर जमली होती.
-
सर्व फोटो: ट्विटर

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…