-
अहमदनगर शहराचे नामांतर करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करावे अशी मागणी केली जात आहे.
-
याच मुद्द्यावर एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
अरे तुम्ही नोकरी द्या, रोजगार द्या. आज भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ढासळत आहेत. आज पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत.- असदुद्दीन ओवैसी
-
गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढल्या आहेत. तुम्हाला फक्त नावांची काळजी लागली आहे. कामाची काळजी करायला हवी.- असदुद्दीन ओवैसी
-
निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांचं काय झालं. सरकार चालवण्यात अपयश येत असल्यामुळे हे मुद्दे बाहेर काढले जात आहेत, अशी प्रतिक्रिया असदुद्दीन ओवैसी यांनी दिली.
-
ओवैसी यांनी वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात होणाऱ्या युतीवरही भाष्य केले आहे.
-
प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याशी युती करत आहेत. हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्यांच्यासोबत होतो.- असदुद्दीन ओवैसी
-
आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत होतो, तेव्हा वंचित समाजाचा विकास व्हावा हाच आमचा उद्देश होता.- असदुद्दीन ओवैसी
-
देशातील वंचितांचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सशक्तीकरण हवे असेल तर अगोदर त्यांचे राजकीय सशक्तीकरण होणे गरजेचे आहे.- असदुद्दीन ओवैसी
-
आता प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत गेले असतील तर मी काय म्हणू शकतो, अशी प्रतिक्रिया असदुद्दीन ओवैसी यांनी दिली.
-
त्यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावरही भाष्य केले. “लव्ह आणि जिहाद हे कधीच सोबत येऊ शकत नाहीत. प्रेम ही संकल्पना पूर्णत: वेगळी आहे. तर जिहाद हादेखील वेगळा आहे. तलवार उचलून कोणालाही मारून टाकणे, म्हणजेच जिहाद असल्याचा समज आहे. मात्र ते चुकीचे आहे.- असदुद्दीन ओवैसी
-
भारतात १८ वर्षे झालेल्या व्यक्तीला त्याच्या आवडीनुसार लग्न करण्याचा अधिकार आहे. एखादी व्यक्ती आपल्या मनाने जोडीदार निवडून लग्न करत असेल, तर कोणालाही त्याबाबत आक्षेप नसावा. ज्या-ज्या राज्यात लव्ह जिहादचा कायदा करण्यात आला. ते सर्व कायदे असंवैधानिक असल्याचे न्यायालयाने सांगितलेले आहे, असेही औवैसी म्हणाले.
४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी