-
भाजपा नेत्या चित्रा वाघ उर्फी जावेद प्रकरणात पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत.
-
चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात ट्विटरवर सातत्याने शाब्दिक युद्ध सुरू आहे.
-
अशात चित्रा वाघ यांनी थेट पत्रकार परिषद करत उर्फी जावेदविरोधात हल्लाबोल केला.
-
यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाला आणि आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनाही लक्ष्य केलं.
-
चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्यात याचा हा आढावा…
-
अत्याचाराचा बळी ठरलेल्या एका नऊ वर्षाच्या पीडित मुलीच्या आईने मला एक व्हिडीओ पाठवला – चित्रा वाघ
-
त्या व्हिडीओत उर्फी जावेद अंगावर नगण्य कपडे घालून भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी आपल्या शरीराचं ओंगळवाणं, किळसवाणं प्रदर्शन करत फिरताना दिसली – चित्रा वाघ
-
त्यांनी मला आणखीही काही इंस्टाग्राम लिंक्स पाठवल्या. त्या तर मी बघूच शकले नाही – चित्रा वाघ
-
व्हिडीओ पाठवणाऱ्या महिलेला मी फोन केला. तिने सांगितलं दीड वर्षांपूर्वी तिची नऊ वर्षांची मुलगी अत्यंत घाणेरड्या विकृतीला बळी पडली – चित्रा वाघ
-
या विषयावर कोणी बोलणार आहे की नाही असा प्रश्न त्या पीडित मुलीच्या आईने विचारला – चित्रा वाघ
-
त्या महिलेशी बोलले म्हणून मी ही कोण उर्फी आहे आणि तिचा काय नंगानाच आहे हे मी त्या दिवशी पाहिलं – चित्रा वाघ
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आम्ही असा नंगानाच चालू देणार नाही – चित्रा वाघ
-
यात बऱ्याच उड्या पडल्या. या सर्व अपेक्षित उड्या होत्या – चित्रा वाघ
-
इथं विषय धर्माचा नाही. इथं विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करणाऱ्या विकृतीचा आहे – चित्रा वाघ
-
आमचा विरोध त्या उर्फीला नाही, त्या महिलेला नाही, तर तिच्या नंगानाच करणाऱ्या विकृतीला आहे – चित्रा वाघ
-
हा आमचा विरोध चालूच असणार आहे आणि आम्ही हा विषय शेवटापर्यंत नेऊ – चित्रा वाघ
-
कोणी काय कपडे घालवे आणि कोणी काय कपडे घालू नये यावर काय बोलायचं असं काहीजण म्हणत आहेत. मात्र, आधी कपडे तर घाला – चित्रा वाघ
-
आधी कपडे घाला, मग ठरवू कोणी काय घालयचं आणि कोणी काय घालयचं नाही – चित्रा वाघ
-
जिथं समाजस्वास्थ्याचा विषय आहे तिथं राजकारण करायचं नसतं – चित्रा वाघ
-
या राज्यात सार्वजनिक ठिकाणी नंगानाच सुरू आहे – चित्रा वाघ
-
ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? याचं उत्तर त्या उर्फीला समर्थन देणाऱ्यांनी द्यावं – चित्रा वाघ
-
अहो, लेकीबाळी प्रत्येकाच्या घरात आहेत. त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवला जाणार आहे – चित्रा वाघ
-
व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली होणाऱ्या हा स्वैराचार मान्य असणारा मला एक तरी पालक दाखवा – चित्रा वाघ
-
ही आपली संस्कृती नाही. म्हणून आम्ही हा नंगानाच महाराष्ट्रात चालू देणार नाही – चित्रा वाघ (सर्व फोटो सौजन्य – उर्फी जावेद इंस्टाग्राम, चित्रा वाघ सोशल मीडिया आणि लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”