-
संजय राऊतांविरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचा नारायण राणेंनी इशारा दिल्यानंतर, संजय राऊतांनीही राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेत एकेरी भाषेत त्यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिले आहे.(सर्व संग्रहित छायाचित्र)
-
संजय राऊत म्हणाले, “पादरा पावटा आहे तो बाळासाहेबांच्या भाषेत, पादरा माणूस आहे. आतापर्यंत मी त्याच्याविषयी काही बोललो नाही, हा सगळ्यांना अरे तुरे करतो हा कोण आहे? ”
-
“मुख्यमंत्र्यांना अरे तुरे, कालपर्यंत एकनाथ शिंदेना अरे तुरे करत होता. जुने व्हिडीओ काढा त्यात मोदींनाही अरे तुरे.”
-
“डरपोक लोक आहात तुम्ही. पळून गेलात किरीट सोमय्यांनी तुमच्यावर जे आरोप केलेत, त्यावर उत्तर दिलं का तुम्ही?”
-
“तुमच्या १०० बोगस कंपन्या आणि इतर सगळं बाहेर काढतो आता मी.”
-
“परत सांगतो नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस. झालं आता मी कालपर्यंत गप्प होतो आज तू मर्यादा सोडली आहेस. तुझ्यासारखे आले ५६ आणि गेले. ”
-
“नामर्द माणूस आहेस तू ईडी आणि सीबीआयच्या भीतीने पळून गेलास. तू आम्हाला लढायच्या गोष्टी काय सांगोतस. तुझी लायकी आहे का?”
-
“हे राऊत विरुद्ध राणे वैगरे काही नाही, त्याला वेड लागलं आहे. तो वेड्यांच्या कळपात आहे. त्या नारायण राणेची सटकली आहे.”
-
“शिंदे गटाच्या माणसांना सामवून घेण्यासाठी नारायण राणेचं मंत्रीपद जाणार आहे, म्हणून तो भैसटला आहे.”

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO