-
राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना विविध मुद्य्यांवर परखड प्रतिक्रिया दिली. (सर्व फोटो- संग्रहित)
-
राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर अजित पवार म्हणाले, “ तारीख पे तारीख तो होनेवाली है. तो त्यांचा अधिकार आहे. न्यायव्यवस्थेला कोणी, तुम्ही-आम्ही विचारू शकतो का?”
-
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर बलात्काराच्या गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले. “एखाद्या व्यक्तीने जर कोणावर बलात्कार केला नाही आणि तरीही त्याच्यावर बलात्काराची केस दाखल करायची म्हणजे ही मोगलाईच लागली. असं दुनियेत कधी घडत नाही.”
-
“हे जर व्हायला लागलं तर यातून महाराष्ट्रात उठाव होईल. महाराष्ट्र शांत किंवा गप्प बसणार नाही.”
-
“लोकांनाही कळतं की कशा पद्धतीने गोवण्यात येतय, काय करण्यात येतय?”
-
“इतक्या खालच्या पातळीवर राज्याचं राजकारण जर जाणार असेल आणि सरकारी यंत्रणा या गोष्टीचा वापर करणार असेल, तर आम्हालापण वेगवेगळ्या आयुधांचा वापर करता येईल, आम्हीपण त्या आयुधांचा वापर करू.”
-
“ पण अशाप्रकारे जर अन्याय होत असेल, तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही काय मूग गिळून बसलेलो नाही.”
-
“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरुवातीपासून शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारी पार्टी आहे.”
-
“आम्हीपण अनेक वर्षे राज्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे. ते काम करत असताना आपण सगळ्यांनी आणि अवघ्या महाराष्ट्रानेही पाहीलं आहे.”
-
“विरोधक गैरप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्याच्याशी आमचा दुरान्वये संबंध नाही, आम्ही आमच्या भूमिकेनेच पुढे जाणार.”
-
“जनतेबाबत कुठल्याबाबतीत चुकीचं घडलेलं असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.”
-
“परंतु सत्ताधारी पक्षाचा उगीचच विरोधकांना त्रास देण्यासाठी जर कोणाला तरी गोवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर तो कुणीही सहन करणार नाही. ”
-
“वास्तविक जर चुका असतील तर त्यावर कारवाई करायला दुमत असण्याचं कारण नाही. पण मुद्दाम कुभाड रचून कोणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर ही महाराष्ट्राची परंपरा नाही. ”
-
“आम्ही साडेसतरा वर्षे सरकारमध्ये काम करत होतो. आमच्याही काळात समोर विरोधी पक्ष होता, त्यावेळी आम्ही अशाप्रकारचा प्रयत्न कदापि केलेला नाही.”
-
“जर जाणीवपूर्वक कोणाला अडकवण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न, आपले राजकीय विरोधक आहेत म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न हा जर कोणी करू पाहत असेल, तर हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही.”

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा