-
नाशिक पदवीधर मतदारसंघात कोणाकडून कोणता उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार यावरून मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या.
-
भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीसांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सत्यजीत तांबेंना भाजपाकडून तिकिट देण्याबाबत सूचक विधान केलं होतं.
-
त्यानंतर आता मागील काही दिवसांपासून सत्यजीत तांबे भाजपाकडून उमेदवारी भरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
-
इतकंच नाही तर काँग्रेसचे आमदार सुधीर तांबे यांनाही भाजपाकडून गळ घातली जात असल्याचे तर्कवितर्क लावले जात होते.
-
अखेर गुरुवारी (१२ जानेवारी) काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
-
मात्र सुधीर तांबे यांच्या नावाने एबी फॉर्म आला असतानाही त्यांनी माघार घेत आपला अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
-
यानंतर त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी भाजपाकडून तुमच्या उमेदवारीसाठी प्रयत्न झाला का? असा प्रश्न विचारला.
-
यावर सुधीर तांबेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते नेमके काय म्हणाले याचा हा आढावा…
-
भाजपाकडून शेवटपर्यंत तुम्ही उमेदवार असावे यासाठी प्रयत्न झाला, असं नाहीये – सुधीर तांबे
-
भाजपाची भूमिका काय आहे हे मला माहिती नाही. मात्र, असं नाहीये – सुधीर तांबे
-
शेवटी त्यांचाही पक्ष मोठा आहे. मला त्यांची तशी काहीही ऑफर नव्हती – सुधीर तांबे
-
काँग्रेसकडून मी तीन वेळा नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो. पहिल्या वेळी मी अपक्ष उमेदवार होतो – सुधीर तांबे
-
पदवीधर मतदारसंघ विधान परिषदेचा एक वेगळा मतदारसंघ आहे. अशा मतदारसंघातून सत्यजीत तांबेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे – सुधीर तांबे
-
सत्यजीत तांबे राज्यात जे तरुण मुलं नेतृत्व करत आहेत त्यात एक दूरदृष्टी असलेलं युवानेतृत्व आहे. त्यांना वेगवेगळ्या विषयांचं सखोल ज्ञान आहे. त्यामुळे हे या निवडणुकीत हे नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं – सुधीर तांबे
-
त्यामुळे आम्ही सत्यजीत तांबे यांचा अर्ज भरला आहे. हा अर्ज महाविकासआघाडीच्या वतीने भरला आहे – सुधीर तांबे
-
आम्ही फक्त सत्यजीत तांबे यांचाच अर्ज भरला आहे – सुधीर तांबे
-
सत्यजीत तांबेंच्या नावाला काँग्रेसमधील काही पक्षश्रेष्ठींनी विरोध केला असं नाही – सुधीर तांबे
-
कोणी विरोध केला असेल असं मला वाटत नाही. कारण आमच्या पक्षाचंही हे धोरण आहे की, तरुण लोक राजकारणात आली पाहिजेत – सुधीर तांबे
-
काँग्रेसने तरुणांना संधी देण्याचं मोठं काम केलं – सुधीर तांबे
-
शेवटच्या क्षणापर्यंत विचार सुरू असतात. त्यामुळे माझ्या नावाची घोषणा झालेली असतानाही सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल केला – सुधीर तांबे
-
सत्यजीत तांबेंनी दोन अर्ज भरले आहेत – सुधीर तांबे
-
एबी फॉर्म माझ्या नावाने आला होता. त्यामुळे थोड्या तांत्रिक अडचणी आहेत. परंतु या निवडणुकीत निवडणूक चिन्ह नसतं. त्यामुळे सत्यजीत या निवडणुकीत महाविकासआघाडीचे उमदेवार म्हणून उभे आहेत – सुधीर तांबे
-
सत्यजीत तांबे हे एक चांगलं नेतृत्व आहे. इथं बऱ्याच गोष्टी अशा असतात की, पक्षाच्याही पलिकडे विचार करावा लागतो – सुधीर तांबे
-
सर्वच पक्ष तसा विचार करत असतात. सर्वच पक्ष सत्यजीत तांबेंना मदत करतील अशी आमची अपेक्षा आहे – सुधीर तांबे (सर्व फोटो – सोशल मीडिया)

Video : जीव महत्त्वाचा की अहंकार? अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी बसने केले कारला ओव्हरटेक, पण पुढे जे घडले…; पुण्यातील एसबी रोडवरील व्हिडीओ व्हायरल